मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली कोरोनाची लस

महाराष्ट्रात राजकीय क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वात प्रथम लस घेतली. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लस घेतली आहे. त्यांच्याबरोबरच मिलिंद नार्वेकर यांनी देखील कोरोनाची लस घेतली आहे.

    मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (गुरूवार) मुंबईतील जे.जे. रूग्णालयात कोरोनाची लस घेतली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सुद्धा रूग्णालयात उपस्थित होते. मुंबईतील जे जे रुग्णालयात त्यांनी सहकुटुंब जाऊन कोरोनाची लस घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी कोव्हिशील्ड लस घेतल्याची माहिती मिळाली आहे.

    देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. यामध्ये १ मार्चपासून ४५ आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येत आहे. केंद्र सरकारमधून पीएम मोदींनी सर्वात प्रथम लस घेतली. त्यानंतर राजकारणातील अनेक नेत्यांनी पुढाकार घेऊन लस घेण्यास सुरूवात केली. महाराष्ट्रात राजकीय क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वात प्रथम लस घेतली. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लस घेतली आहे. त्यांच्याबरोबरच मिलिंद नार्वेकर यांनी देखील कोरोनाची लस घेतली आहे.

    राज्यातील काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच राज्यात कोरोना लसीकरणाची मोहिम टप्प्या-टप्प्याने सुरू आहे. परंतु कोरोना लसीसंदर्भातील संभ्रम दूर व्हावा. या हेतूने उद्धव ठाकरेंनी कोरोनाची लस घेतली असून सर्वांनीच लसीकरणाच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं. असा संदेश देण्यासाठी राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी लस घेतल्याचे सांगण्यात येत आहे.