मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सामान्य जनतेला धडे देतात, मंत्र्यांसमोर त्यांचे काही चालत नाही; निलेश राणेंचा टोला

पुन्हा वाढत असलेल्या गर्दीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यावर चिंता व्यक्त केली आहे. आताची गर्दी अशीच राहिली तर कोरोनाची तिसरी लाट येण्याअगोदर दुसरीच लाट परत उलटेल, असं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे.

    मुंबई : गेल्या वर्षभरापासून सगळीकडे कोरोना रोगाने थैमान घातलं आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत होती. सध्या सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट आहे. त्यातही रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत होती.  मात्र काही दिवसांपूर्वी ही लाट ओसरत असल्याचं दिसून येत आहे. मात्र पुन्हा वाढत असलेल्या गर्दीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यावर चिंता व्यक्त केली आहे. आताची गर्दी अशीच राहिली तर कोरोनाची तिसरी लाट येण्याअगोदर दुसरीच लाट परत उलटेल, असं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

    निलेश राणे काय म्हणाले ?

    या संदर्भात त्यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी आता वाटायला लागलय मुख्यमंत्र्यानाच तिसरी लाट हवी आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. तसेच, मंत्रिमंडळातले मंत्री कार्यालयाच्या उद्घाटनाला गर्दी करतात, स्वतः मुख्यमंत्री मेट्रोला झेंडा दाखवताना तुडुंब गर्दी झाली. मुख्यमंत्री फक्त सामान्य जनतेला धडे देतात पण जिथे मंत्र्यांची वेळ येते तेव्हा मुख्यमंत्र्याची चालत नसल्याचंही निलेश राणेंनी म्हटलं आहे.

    डेल्टा प्लस व्हेरिएंटने डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनकडून वर्तवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कोरोनासारख्या महाभयंकर रोगाचा सामना करायचा असेल,तर सर्वांनी सरकारने घालून दिलेल्या नियमांचं पालन करणं अत्यावश्यक झालं आहे.