मुंबईतील फिल्मसिटी उत्तर प्रदेशात नेण्याबाबत खलबतं?, योगी आदित्यनाथ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जुगलबंदी

उत्तर प्रदेशचे (U.P) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) काल मंगळवारपासून मुंबई दौऱ्यावर (Mumbai Tour) आहेत. मुंबईमध्ये दाखल होताच त्यांनी सर्वात पहिले खिलाडियो के खिलाडी अक्षय कुमारची (Akshat Kumar) भेट घेतली. त्यानंतर आज बुधवारी मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये काही निर्माते, गूंतवणूकदार आणि उद्योगपतींशी बैठक घेऊन चर्चा करणार आहेत.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput)  आत्महत्या प्रकरणानंतर अंमली पदार्थांचे सेवन करण्याबाबत संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये (Bollywood Industry)  खळबळ उडाली होती. अंमली पदार्थांबाबत बॉलिवूडमधील अनेक अभिनेता आणि अभिनेत्री एनसीबीच्या (NCB) रडारवर होते. त्यामुळे देशभरातून बॉलिवूड क्षेत्रावर टीकांचा (Criticize)  झडीमार झाला. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बॉलिवूड फिल्मसिटी उत्तर प्रदेशला उभारण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) काल मंगळवारपासून मुंबई दौऱ्यावर (Mumbai Tour) आहेत. मुंबईमध्ये दाखल होताच त्यांनी सर्वात पहिले खिलाडियो के खिलाडी अक्षय कुमारची (Akshay Kumar) भेट घेतली. त्यानंतर आज बुधवारी मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये काही निर्माते, गूंतवणूकदार आणि उद्योगपतींशी बैठक घेऊन चर्चा करणार आहेत.

सध्या देशाला एका चांगल्या फिल्मसिटीची गरज आहे. सर्वांत मोठ्या हिंदी फिल्म उद्योगासाठी मुंबई प्रसिद्ध आहे. पण देशातली सर्वांत मोठी आणि सुंदर फिल्मसिटी ही उत्तरप्रदेशला उभारण्यात येणार आहे. ही फिल्मसिटी गौतमबौध्दनगरमधल्या ग्रेटर नोएडामध्ये १००० एकरात उभी करण्यात येणार आहे. या फिल्मसिटीमुळे निर्मात्यांना एक चांगला पर्याय उपलब्ध होईल आणि रोजगारही वाढेल. असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

हिंमत असेल तर फिल्मसिटी उत्तरप्रदेशला नेऊन दाखवा,असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडून आयोजित केलेल्या सत्रात ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, बॉलीवूड क्षेत्राला सध्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे. त्या समस्या सरकारकडून सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. दादासाहेब फाळके यांनी ज्या भूमीत चित्रपटसृष्टीची मूहूर्तमेढ रोवली त्याठिकाणी मी तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही.