मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी १ वाजता जनतेशी साधणार संवाद, ‘या’ विषयांवर बोलण्याची शक्यता

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या, कोरोना परिस्थिती, आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा यावर मुख्यमंत्री बोलण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील अर्थव्यवस्था तसेच कोरोना रुग्णालयातील परिचारिका आणि डॉक्टरांच्या वेतनाबाबत मुख्यमंत्री कोणती घोषणा करणार का यावरही जनतेचे लक्ष लागले आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आज राज्यातील जनतेशी दुपारी १ वाजता संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री बऱ्याच दिवसांनंतर आज जनतेशी संवाद साधत आहेत. राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करतील, तसेत कोरोनामुळे वाढत्या रुग्णांचे प्रमाण आणि मृत्यू. तसेच मुंबईत सुरु असलेले कंगना प्रकरण यावर मुख्यमंत्री काही भाष्य करतात का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर मुख्यमंत्री काय बोलणार आहेत. तसेच मराठा आरक्षण संदर्भात कोणता निर्णय घेणार यावर राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला नाही आहे.