CM Uddhav Thackeray (Live) | मुंबई-महाराष्ट्राच्या विकासासाठी मी अहंकारी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेट9 महीने पहले

मुंबई-महाराष्ट्राच्या विकासासाठी मी अहंकारी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ऑटो अपडेट
द्वारा- Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
13:25 PMDec 20, 2020

मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी मी अहंकारी

-  माझ्या मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी मी अहंकारी आहे 

- जे जनतेच्या हिताचं ते सरकार करण्याचं प्रयत्न करत आहे.

- मेट्रो कारशेड प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल

- कांजूरला मेट्रोच्या ३ लाईनची कामं सुरू करू शकतो

- बुलेट ट्रेनला शेतकऱ्यांकडून विरोध होतोय

- केंद्राने आणि राज्याने एकत्र बसून जागेचा वाद सोडवला पाहिजे

- कांजूरच्या जागेचा वाद चर्चेतून सोडवण्याचं मुख्यमंत्र्याचं आवाहन

- प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण करत असू तर खुर्चीत बसण्याचा अधिकार नाही 

- विरोधकांना श्रेय द्यायला तयार आहोत

- महाराष्ट्रातल्या जनतेच्या विकासासाठीच काम करणार

-  विकास दूरगामी परिणाम लक्षात घेऊन झाला पाहिजे

 

13:12 PMDec 20, 2020

नवीन वर्षाचं स्वागत करताना सावध रहा

- मास्क हे सर्व ठिकाणी वापरण्याचं शस्त्र आहे. 

- नवीन वर्षाचं स्वागत करताना सावध रहा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन

- महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत.

-  राज्यात आर्थिक चणचण आहे, तसेच केंद्राकडूनही पैसै येणे बाकी आहे. 

- जूनमध्ये झालेल्या करारांचं ७० टक्के काम पूर्ण 

-  संसर्ग रोखण्यासाठी युरोपमध्ये लॉकडाऊनशिवाय काही पर्याय नाही

-  महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लावण्याची गरज नाही

-  परदेशात शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

-  अति घाई करणं हे विकासाचं साधन आहे.

 

13:07 PMDec 20, 2020

लस आली तरी मास्क लावणं बंधनकारक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

-  सावध रहा म्हणून सांगण हे कुटुंबप्रमुख म्हणून माझं कर्तव्य - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

-  लस आली तरी मास्क लावणं बंधनकारक असणार

- हिवाळ्यात आरोग्याची काळजी घ्यायला हवी, तसेच पुढचे सहा महिने मास्क लावणं गरजेचं

- कोरोनाच्या परिस्थितीवर काही प्रमाणात नियंत्रण आलं आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Virus) काहीसा कमी होताना दिसत आहे. परंतु गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेली मुंबईची लाईफलाईन (Mumbai Local) कधी सुरू होणार ? याची प्रतिक्षा सर्वच लोकांना लागून आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) आज रविवारी दुपारी १ वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे लोकल सुरू करण्याबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच कोरोनाला आळा घालण्यासाठी संपूर्ण जगभरात कोरोनाच्या लस (Corona Vaccine) निर्मितीचे काम सुरू आहे. अखेर ९ महिन्यानंतर लस उपलब्ध झाली असून या लसीचे राज्यात कसे वितरण होणार, याबाबत मुख्यमंत्री काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत लोकलची सुविधा पुन्हा एकदा सुरू करण्यात यावेळी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. परंतु, अत्यावश्यक सेवा म्हणून लोकल सध्या सुरू आहे. हिवाळी अधिवेशनात सुद्धा लोकल सुरू करण्याबाबत सवाल उपस्थितीत झाला होता. मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी १ जानेवारीपासून लोकल सेवा सुरू करण्याचे संकेत दिले होते.

मुंबईतील कारशेडचा मुद्दा असो किंवा लाईट बिलात नागरिकांना न मिळालेली सवलत असो, यासह कोरोना आणि इतर बाबींसंदर्भातही उद्धव ठाकरे नागरिकांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
२८ मंगळवार
मंगळवार, सप्टेंबर २८, २०२१

भारत बंदपुढे केंद्र सरकार झुकेल का? तुम्हाला काय वाटतं?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.