नियम मोडल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत, संजय राठोड यांच्या शक्ती प्रदर्शनावर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

संजय राठोड यांच्या समर्थनासाठी झालेल्या गर्दीविषयी संजय राऊत यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारले असता, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे संजय राऊत म्हणाले. तसेच पोहरादेवीत नियमांचे उल्लंघन झाले आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

    मुंबई : शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या पोहरादेवी शक्तिप्रदर्शनावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. यावेळी नियम मोडल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. पोहरादेवी येथे कोरोना प्रतिबंधासाठी घालून देण्यात आलेले निर्बंध झुगारुन गर्दी जमली होती. यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे संजय राऊत यांनी सांगितले.

    संजय राठोड यांच्या समर्थनासाठी झालेल्या गर्दीविषयी संजय राऊत यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारले असता, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे संजय राऊत म्हणाले. तसेच पोहरादेवीत नियमांचे उल्लंघन झाले आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. उद्धव ठाकरे हे कायद्याची आणि नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करतात. ते आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडणार नाहीत. त्यामुळे या प्रकरणात राज्य सरकारकडून कायद्याचे पालन केले जाईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

    पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने राज्यातील राजकारणात एकच गोंधळ निर्माण झाला होता. तसेच पोहरादेवी मंदिरात गर्दी जमवल्याप्रकरणी संजय राठोड यांच्यावर कारवाई होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.