मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा, म्हणाले…

देशात कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे ही वेळ कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नियम पाळून गणेशोत्सव साजरा करण्याची आहे. आपण दरवर्षी श्रींची प्राणप्रतिष्ठापना करतो मात्र यंदाही करत आहोत. परंतु या वेळेस आपल्या सर्वांवर कोरोना विषाणूचे विघ्न आहे. या विघ्नातून आपल्याला लवकरात लवकर मुक्ती मिळवायची आहे. कोरोना साथीचा लढा आपल्याला जिंकायचा आहे.

मुंबई : देशासह राज्यात आजपासून गणेशोत्सवास सुरुवात झाली आहे. त्यामुळे देशातील वातावरण मंगलमय झाले आहे. तसेच बाप्पाचे आगमन होताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याबाबत जागरुक राहायचे आहे. तसेच जबाबदारीने वागायचे आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोना संकटामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा. तसेच राज्यातील करोनाच्या विघ्नातून लवकरात लवकर मुक्ती मिळावी, तसेच या संसर्गाचा सामना करण्यासाठी कोविड योद्ध्यांना आणि आपल्या सर्वांना शक्ती मिळो अशी प्रार्थन केली आहे.

देशात कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे ही वेळ कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नियम पाळून गणेशोत्सव साजरा करण्याची आहे. आपण दरवर्षी श्रींची प्राणप्रतिष्ठापना करतो मात्र यंदाही करत आहोत. परंतु या वेळेस आपल्या सर्वांवर कोरोना विषाणूचे विघ्न आहे. या विघ्नातून आपल्याला लवकरात लवकर मुक्ती मिळवायची आहे. कोरोना साथीचा लढा आपल्याला जिंकायचा आहे. राज्यातील सर्व कोविड योद्ध्यांना आणि आपल्या सर्वांना कोरोना विरोधीत लढण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना उद्धव ठाकरे यांनी श्री गणेशाकडे केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेश आगमनाच्या पुर्वसंध्येला राज्याला शुभेच्छा दिल्या आहेत.