
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. पण, आता उपचाराअंती त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. पण, आता उपचाराअंती त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर 30 मार्च रोजी एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
सोमवारी संध्याकाळी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रश्मी ठाकरे या हॉस्पिटलमधून वर्षा निवास्थानी परत आल्या आहेत. त्यांची तब्येत सध्या चांगली असल्याची माहिती देण्यात आली आहे.