uddhav thakre and kishori pednekar visit to sunrise bhandup

भांडुपच्या ड्रीम्स मॉल्समध्ये मध्यरात्री लागलेल्या(bhandup dreams mall fire) भीषण आगीमध्ये सनराइज रुग्णालयातील ११ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav thakre) यांनी या घटनेची गंभीरतेने दखल घेतली. त्यांच्यासमवेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर(kishori pednekar) यांनी आज घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

  मुंबई: भांडुपच्या ड्रीम्स मॉल्समध्ये मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीमध्ये सनराइज रुग्णालयातील ११ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav thakre) यांनी या घटनेची गंभीरतेने दखल घेतली. त्यांच्यासमवेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर(kishori pednekar) यांनी आज घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच दुर्घटनेची माहिती घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाचे अधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांसमवेत सनराइज रुग्णालयाला लागलेल्या आगीबाबत चर्चा केली.

  याप्रसंगी आमदार सुनील राऊत, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, आरोग्य समिती अध्यक्षा प्रविणा मोरजकर, महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा राजराजेश्वरी रेडकर आदी उपस्थित होते.

  आगीची घटना समजल्यानंतर काल मध्यरात्री या ठिकाणी भेट देऊन मॉलमध्ये असलेल्या सनराइज रुग्णालयाबाबत विचारणा करून संबंधित कोविड रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये तात्काळ हलविण्याचे निर्देश दिले. मॉलमध्ये कोविड रुग्णालय असणे ही गंभीर बाब असून याबाबत सर्वंकष चौकशीचे आदेश दिल्याची माहिती महापौर पेडणेकर यांनी दिली.

  रुग्णालय बंदचे आदेश दिले होते

  सनराइज रुग्णालयाला २८ फेब्रुवारी २०२१ रोजी बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी ३१ मार्च २०२१ पर्यंत रुग्णालय बंद करू, असे रुग्णालय व्यवस्थापनाने महापालिका प्रशासनाला सांगितले होते. त्‍यानंतर कोविडची रुग्णसंख्या वाढल्यानंतर हे रुग्णालय पुन्हा सुरू झाले होते. आग ही मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागल्यानंतर ती जोमाने वाढून वर कोविड सेंटरपर्यंत जाऊन पसरली. त्यातून ही दुर्घटना घडली असून या ठिकाणी अग्नीसुरक्षेची पुरेशी काळजी घेण्यात आली होती का ? याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

  फायर ऑडिटचेही आदेश

  मुंबईतील आगीच्या दुर्घटनेनंतर सर्व ठिकाणचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश अग्निशमन दलासोबत घेतलेल्या बैठकीत दिले असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यासोबतच सर्व कोविड सेंटरमधील फायर ऑडिट तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही दिले असल्याचे महापौरांनी सांगितले. या आगीचा दोन दिवसात संपूर्ण अहवाल आल्यानंतरच यामध्ये जो कोणी दोषी आढळेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे महापौरांनी सांगितले.