हात टेकले यांच्यासमोर, पावसात लोक मेले तरी मुख्यमंत्री घर सोडेनात : भाजप आमदार भातखळकर यांचे व्टिट

मुंबई परिसरात पावसाने दरड कोसळण्याच्या घटना घडल्या त्यात एकाचवेळी अनेक लोक मरण पावले आहेत. मुंबई महापालिका व राज्यातील सत्ताधारी असलेल्या पक्षाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यानी याकडे जातीने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत भातखळकर यानी व्टिट केले आहे.

    मुंबई : कोरोनाच्या काळात मुख्यमंत्रउध्दव ठाकरे यांचे वर्क फ्रॉम होम सुरू असते त्यामुळे ते क्वचितच बाहेर पडतात. सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामकाज आणि कार्यक्रम  करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीवर भाजप नेत्यांनी नेहमीच टिका केली आहे. मुख्यमंत्री घर सोडत नाहीत, लोकांना दिलासा कोण दिसणार? अशी टिका पुन्हा एकदा भाजप आमदार अतुल भातखळकर यानी व्टिट करत केली आहे.

    महोदय घर सोडायला तयार नाहीत
    मुंबई परिसरात पावसाने दरड कोसळण्याच्या घटना घडल्या त्यात एकाचवेळी अनेक लोक मरण पावले आहेत. मुंबई महापालिका व राज्यातील सत्ताधारी असलेल्या पक्षाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यानी याकडे जातीने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत भातखळकर यानी व्टिट केले आहे.’मुंबईत २५ लोक पावसामुळे मेले तरी मा.मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर…’. मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाचे टिपणही त्यांनी व्टिटसोबत जोडले आहे.