फेरीवाल्याच्या हल्ल्यात तीन बोटे गमावलेल्या कल्पिता पिंपळेंना मुख्यमंत्र्यांचा फोन

तुमच्या बहादुरीचे वर्णन करण्यास आपल्याकडे शब्द नाहीत. हे बोलणे ऐकूण काही वेळ कल्पिता पिंपळे देखील गहिवरल्या. आपण लवकर बऱ्या व्हा व इतर कोणत्याच गोष्टीची आपण काळजी करू नका असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

    मुंबई : ठाण्यात काही दिवसांपूर्वी एका माथेफिरुच्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर दुखापत झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या पालिका सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्याशी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरून संवाद साधला.

    मुख्यमंत्री म्हणाले की, तुमच्या बहादुरीचे वर्णन करण्यास आपल्याकडे शब्द नाहीत. हे बोलणे ऐकूण काही वेळ कल्पिता पिंपळे देखील गहिवरल्या. आपण लवकर बऱ्या व्हा व इतर कोणत्याच गोष्टीची आपण काळजी करू नका असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. त्या माथेफिरुला कडक शासन व्हावे ही इच्छा कल्पिता यांनी बोलून दाखवताच त्याची काळजी तुम्ही करू नका अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले. महापौर नरेश म्हस्के यांच्या मोबाईलवरून हा फोन लावण्यात आला होता.

    यावेळी आयुक्त डॉ विपीन शर्मा यांची सानुग्रह निधी उपलब्ध करून देण्याची मागणी देखील मुख्यमंत्र्यांनी त्वरित मान्य केली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्पिता पिंपळे प्रकरणात सरकारचे मोठे पाऊल उचलले असून खटला लढवण्याकरता विशेष वरीष्ठ वरीलांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच आरोपी अमरजीत यादवला जास्तीत जास्त कठोर शिक्षा होईल याबाबत सरकार प्रयत्न करणार आहे. दोनच दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा कल्पिता पिंपळे यांची भेट घेऊन विचारपूस केली होती