sanjay kumar

मुख्य सचिव संजयकुमार यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांची खबरदारी म्हणून कोरोनाच चाचणी करण्यात आली यामध्ये एका कर्मचाऱ्याचा रिपोर्ट सकारात्मक आल्यामुळे मुख्य सचिवांनीही आपली कोरोना चाचणी केली. यात त्यांचाही अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे.

मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाने (Corona Virus) धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत दिग्गज नेत्यांना आणि लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झाली आहे. अनेकांनी कोरोनावर यशस्वी मात दिली आहे. तर अनेक नेते कोरोनाशी झुंज देत आहेत. अशातच राज्याचे मुख्य सचिव (Chief Secretary of State) संजयकुमार (Chief Secretary of State ) यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंत्रालयात अनेक मंत्र्यांना आणि त्यांच्या दालनातील अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुख्य सचिव संजयकुमार यांचा काल रात्री उशीला कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे.

मुख्य सचिव संजयकुमार यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांची खबरदारी म्हणून कोरोनाच चाचणी करण्यात आली यामध्ये एका कर्मचाऱ्याचा रिपोर्ट सकारात्मक आल्यामुळे मुख्य सचिवांनीही आपली कोरोना चाचणी केली. यात त्यांचाही अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे.

मुख्य सचिवांनी मंत्रालयात विविध नियोजनासंदर्भात अनेक बैठका घेतल्या होत्या. त्यामुळे त्यांचा अनेक अधिकाऱ्यांसी संपर्क आला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र मुख्य सचिवांना कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळली नाही आहेत. म्हणुन ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्या राहत्या घरीच क्वारंटाईन झाले आहेत. ते घरी क्वारंटाईन असले तरी त्यांनी आपल्या घरुनच कामकाजाला सुरुवात केली आहे.