मुख्य सचिव सिताराम कुंटे आणि पोलीस प्रमुख संजय पांडे सीबीआय कार्यालयात जावून जबाब नोंदविणार; देवेंद्र फडणवीस यांनी केला होता गंभीर आरोप

राज्य सरकारच्या काही बड्या नेत्यांसह अधिका-यांनी संगनमत करून बदल्यांचा घोटाळा केल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस(Opposition leader Devendra Fadnavis ) यांनी केला होता. राज्याच्या गुप्तवार्ता विभाग प्रमुख रश्मी शुक्ला यांनी याबाबतचा अहवाल दुल्याचा उल्लेख फडणवीस यांनी केला होता. या प्रकरणी फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांना भेटून गोपनीय कागदपत्रांसह पुरावे दिल्याचे सांगितले होते. या प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग तपास करत असून राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे(Chief Secretary Sitaram Kunte) आणि पोलीस प्रमुख संजय पांडे(Police Chief Sanjay Pandey ) यांना उद्या सीबी आयने त्यांच्या बीकेसी येथील कार्यालयात जबाब नोंदविण्याबाबत समन्स बजावले आहेत.

    मुंबई : राज्य सरकारच्या काही बड्या नेत्यांसह अधिका-यांनी संगनमत करून बदल्यांचा घोटाळा केल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस(Opposition leader Devendra Fadnavis ) यांनी केला होता. राज्याच्या गुप्तवार्ता विभाग प्रमुख रश्मी शुक्ला यांनी याबाबतचा अहवाल दुल्याचा उल्लेख फडणवीस यांनी केला होता. या प्रकरणी फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांना भेटून गोपनीय कागदपत्रांसह पुरावे दिल्याचे सांगितले होते. या प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग तपास करत असून राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे(Chief Secretary Sitaram Kunte) आणि पोलीस प्रमुख संजय पांडे(Police Chief Sanjay Pandey ) यांना उद्या सीबी आयने त्यांच्या बीकेसी येथील कार्यालयात जबाब नोंदविण्याबाबत समन्स बजावले आहेत.

    शुक्ला गोपनीय अहवाल प्रकरणात जबाब

    या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मनसुख हिरेन प्रकरणात आरोपी असलेल्या सचिन वाझे याने देखील बदल्यां संदर्भात गृहमंत्री कार्यालयातील अधिका-यांना पैसे दिल्याचा जबाब दिला होता, त्यानंतर तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खाजगी सचीव कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांना सक्त वसुली संचलनालयाने अटक केली आहे. या  शिवाय रश्मी शुक्ला यांच्या गोपनीय अहवाल प्रकरणात तात्कालीन गृहसचिव म्हणून सध्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांचा जबाब नोंदविला जाण्याची शक्यता आहे.

    कार्यालयात जाण्यास नकार

    या बाबत कुंटे आणि पांडे यानी मागील सप्ताहात जबाब नोंदविण्यास बीकेसी येथील कार्यालयात जाण्यास शक्य नसल्याचे सांगत मंत्रालयात येवून जबाब नोंदवून घ्यावे अशी विनंती केली होती. बिकेसी येथे न येण्यामागे माध्यमांच्या ससेमि-यापासून दूर राहण्यासाठीचे कारण या दोघा उच्चपदस्थांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र सीबीआयने त्याबाबत नकार दिल्याने पांडे आणि कूंटे यांना बिकेसी येथे सीबीआयच्या कार्यालयात जावून जबाब नोंदविण्यात येणार आहे.