9900 children infected with corona; Anxiety about the third wave increased

काेराेनाच्या काळात बालकांची काळजी घेण्याचे आणि त्यांना संरक्षणाचे वातावरण मिळाले पाहिजे(COVID-19 and children). त्यासाठी अधिक काम करण्याची गरज आहे, अशी भुमिका निर्मला निकेतन आणि काॅलेज ऑफ साेशल वर्करच्या परिषदेत मत व्यक्त करण्यात आले.

    मुंबई : काेराेनाच्या काळात बालकांची काळजी घेण्याचे आणि त्यांना संरक्षणाचे वातावरण मिळाले पाहिजे(COVID-19 and children). त्यासाठी अधिक काम करण्याची गरज आहे, अशी भुमिका निर्मला निकेतन आणि काॅलेज ऑफ साेशल वर्करच्या परिषदेत मत व्यक्त करण्यात आले.

    कॉलेज ऑफ सोशल वर्क’ निर्मला निकेतन’ यांच्या वतीने गेल्या साेमवारी आणि मंगळवारी दाेन दिवशीय ऑनलाईन राज्यस्तरीय परिषद पार पडली. काेराेनाच्या काळातील बाल संरक्षण संदर्भातील समस्या आणि प्रतिसाद” या विषयावर या विषयावर चर्चा झाली. परिषदेच्या उद्घाटनाच्या भाषणात प्राचार्य डॉ. लिडविन डायस यांनी बाल संरक्षणाच्या सक्रीय सहभागाची गरज असल्याचे अधोरेखित केले. बाल संरक्षण यंत्रणा अधिक मजबूत होण्यासाठी महाविद्यालयातर्फे आणि वस्ती पातळीवरील उपक्रमां वर भर देण्याची भुमिका डाॅ. आशा वाजपेयी यांनी मांडली. बालहक्क कार्यकर्ते आणि समाजकार्याचे विद्यार्थी यावेळी उपस्थित हाेते.

    डाॅ. नीलिमा मेहता यांनी उपेक्षित दुर्लक्षित मुलांसाठी एक रोडमॅप तयार करण्याची गरज असल्याचे मत मांडले. बाल संरक्षण म्हणजे प्रत्येक बालकाला काळजी आणि संरक्षणाचे वातावरण मिळाले पाहिजे. सुरक्षित आणि कुटुंबवत्सल वातावरण मिळाले पाहिजे. वस्ती पातळीवरील बाल संरक्षण विषयावर अधिक काम करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले.

    राज्य शासनाच्या स्पेशल टास्क फोर्सने तयार केलेल्या ज्या मुलांपर्यंत सुविधा पाेचत नाहीत, त्यांच्यापर्यंत त्या सुविधा पोहोचण्याची व्यवस्था शासनातर्फे केल्याबद्दल सरकारच्या कामाचे काैतूक करण्यात आले. या विषयासाठी एक अहवाल तयार करण्यात यावा, त्यासाठी एक सेंटर तयार करावे, ज्यामध्ये संशोधन आणि संसाधन इतरांपर्यंत पोचवण्याचे कार्य हाती घेतले जाईल असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. परिषदेच्या संयोजिका डॉ. रेणू शहा यांनी प्रस्तावना केली.