यंदा ‘चिंतामणी’चा आगमन सोहळा रद्द – मंडपातच मूर्तीकार घडविणार गणेशमूर्ती

मुंबई: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगन सोहळा यावर्षी रद्द करण्यात आला आहे. आगमन सोहळ्याची परंपरा खंडित करुन यंदा पहिल्यांदा गणेश मंडपातच श्रींची मूर्ती साकारण्यात येणार

मुंबई: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगन सोहळा यावर्षी रद्द करण्यात आला आहे. आगमन सोहळ्याची परंपरा खंडित करुन यंदा पहिल्यांदा गणेश मंडपातच श्रींची मूर्ती साकारण्यात येणार आहे. गिरणगावातील प्रसिद्ध असलेया चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे १०१ वे वर्ष आहे. सध्याचा कोरोनाचा प्रादुर्भाव आणि जनतेच्या भावना लक्षात घेत आगमन सोहळा रद्द करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.    

चिंतामणीच्या मूर्तीकार रेश्मा विजय खातू यांनी मंडपातच मूर्ती साकारण्याचे निवडले आहे. सरकारने दिलेल्या निर्देशाप्रमाणेच ही मूर्ती साकारण्यात येणार आहे. यामुळे पाट पूजन सोहळाही तूर्तास रद्द करण्यात आला असून, काही मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काही दिवसांनी हा सोहळा करण्यात येणार आहे. यावर्षी गणेश मंडळाने फारशी सजावट न करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाच्या काळात दानात मिळणारी रक्कम ही सरकारी रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणे घेण्यासाठी देण्यात येणार आहे. यंदा प्रत्यक्ष दर्शनाऐवजी चिंतामणीचे दर्शन भाविकांना ऑनलाईन घेता येणार आहे. देणगीदारांव्यतिरिक्त इतर भाविकांना यंदा मुखदर्शनाचा लाभ होणार नाही, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष उमेश नाईक यांनी दिली आहे. तर गणेशोत्सवाच्या काळात गर्दीला परवानगी नसल्याची माहिती वासुदेव सावंत यांनी दिली आहे.