Church will also start in Mumba Church will also start in Mumba

मुंबईतील चर्चेस सर्वसामान्यांना अजूनही बंद आहेत. केवळ खासगी प्रार्थना करणाऱ्यांना प्रवेश दिला जात आहे. आता पुढील आठवड्यापासून चर्चेस सर्वांसाठी सुरू होणार आहे.

मुंबई : राज्य सरकारने धार्मिक स्थळे सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर आता मुंबईत सर्व चर्चेस येत्या रविवारी म्हणजे २९ नोव्हेंबरपासून खुली होणार आहे. सरकारने धार्मिक स्थळे सुरू करण्यासंदर्भात काही नियमावली तयार केली आहे. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या नियमावलींचे पालन करत हे चर्चेस सुरू होणार आहे.

महाराष्ट्र सरकारने १६ नाव्हेंबरपासून धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर अनेक धार्मिक स्थळे भाविकांसाठी सुरू झाली आहेत. परंतु, मुंबईतील चर्चेस सर्वसामान्यांना अजूनही बंद आहेत. केवळ खासगी प्रार्थना करणाऱ्यांना प्रवेश दिला जात आहे.

रविवारची ‘मास प्रार्थना’ अजूनही बंद आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चेस सॅनिटाईज करणे, सुरक्षित उपाययोजना करणे इत्यादी उपक्रम सध्या सुरू आहे. त्यामुळे आता पुढील आठवड्यापासून चर्चेस सर्वांसाठी सुरू होणार आहे.