सिडकोचं घर घेतलेल्यांची प्रतीक्षा संपली, १ जुलैपासून मिळणार घरांचा ताबा

महागृहनिर्मितीतील घरांचा ताबा(Cidco home possession from July)  सिडको एक जुलैपासून देणार आहे.

    मुंबई: कोरोना(Corona) आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown)गेले ८ महिने लांबणीवर पडलेला महागृहनिर्मितीतील घरांचा ताबा(Cidco home possession from July)  सिडको एक जुलैपासून देणार आहे. दोन वर्षांपूर्वी सिडकोने १४ हजार ८३८ घरांची सोडत काढली होती. या सोडतीतील लाभार्थींना ऑक्टोबर २०२०पर्यंत ताबा देण्याचे आधी सांगण्यात आले होते. मात्र कोरोनामुळे सिडकोच्या या घरांचे बांधकाम ठप्प झाले. त्यानंतर सिडकोने यंदा काही घरांचे बांधकाम पूर्ण केले असून ग्राहकांना टप्याटप्याने ताबा दिला जाणार आहे.

    या घरांचे संपूर्ण हप्ते भरणाऱ्या ग्राहकांना पहिल्यांदा हा ताबा दिला जाणार असून त्यांना इतर किरकोळ खर्च भरण्यासाठी जून महिना देण्यात आला आहे.

    घर मिळाल्यानंतर सुमारे ५ हजार ग्राहकांनी विविध वित्त संस्थांकडून कर्ज घेतले होते. काही जणांनी कर्जाचे संपूर्ण हप्ते भरले आहेत. कोरोनामुळे गेल्या वर्षी देशभर लॉकडाऊन लागू करण्यात आली होती. सिडकोच्या बांधकामांवरील मजूर त्यांच्या गावी गेल्याने अनेक कामे ठप्प होती.

    गेल्या वर्षीही सिडकोने ९२६८ घरांची सोडत काढली आहे. त्यामुळे एकूण २५ हजार घरांचे बांधकाम सुरू आहे. घरासाठी काढलेले कर्ज आणि भाडे अशा दुहेरी आर्थिक संकटात ग्राहक अडकले असून सिडकोने घरांचा ताबा लवकर द्यावा, अशी मागणी होऊ लागली. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सिडकोने जून जुलैमध्ये घरांचा ताबा दिला जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे सिडकोने १ जुलैपासून लाभार्थींना टप्याटप्याने ताबा दिला जाणार अस्लयाचे सिडकोच्या वतीने शुक्रवारी जाहीर करण्यात आले .