न्यायवैद्यक मृतांची प्रकरणे वगळता अन्य मृतदेहांची कोरोना चाचणी न करण्याचे परिपत्रक जारी

मुंबई - कोरोनाने देशात थैमान घातले आहे. त्यातच इतर आजारांमुळे मृत्यू होणाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात होती. परंतु राज्य सरकराने आता मृतदेहाची कोरोना चाचणी अहवाल न काढण्याचे परिपत्र जारी केले

 मुंबई – कोरोनाने देशात थैमान घातले आहे. त्यातच इतर आजारांमुळे मृत्यू होणाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात होती. परंतु राज्य सरकराने आता मृतदेहाची कोरोना चाचणी अहवाल न काढण्याचे परिपत्र जारी केले आहे. व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचा कोरोना अहवाल काढला जात होता. यात नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. तसेत मृतदेहांची हेळसांड होत होती.  कोरोना काळात फक्त वेद्यकीय देखरेखेखाली मृत्यू झालेल्या मृताचे शवविच्छेदन करावे. अन्य मृतांचे वैद्यकीय तपासणी, मृत्यूचे कारण, बाह्यतपासणी, तसेच आदिचे उपचार यावरुन मृत्यूचे कारणा शोधावे. असे भारतीय वैद्यकीय  संशोधन परिषदेच्या मार्गदर्शन तत्वात नमूद केले आहे. 

कंटेंन्मेंट झोन परिसरातील व्यक्तीचा मृत्य झाला असल्यास त्या मृतदेहाची कोरोना चाचणी केली जात होती. परंतु चाचणी अहवाल उशीरा येईपर्यंत मृतदेह रुग्णालयांच्या ताब्यात ठेवले जायचे. यामुळे नातेवाईकांना नाहक त्रास होत होता. काही वेळेस वैद्यकीय अधिकारी मृत्यूचे कारण देण्यास टाळाटाळ करत असत व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवत असत. याचीच दखल राज्य सरकारने घेत परिपत्रक जारी केले आहे. त्यात असे नमूद केले आहे की फक्त न्यायवैद्यक मृतांची प्रकरणे वगळता अन्य मृतदेहांची कोरोना चाचणी करु नये.