कोरोनाची तिसरी लाट थोपवायची की तिला निमंत्रण द्यायचे हे नागरिकांनी ठरवावे; माझा डॉक्टर परिषदेत मुख्यमंत्र्यानी घातली जनतेला साद

जर तिसरी लाट अपरिहार्य असेल, ती येऊ नये अशी आपली प्रार्थना आहे. पण प्रार्थनेच्या पुढे एक पाऊल पुढे टाकताना प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्याला तिसरी लाट येऊ द्यायची नाहीच. ती थोपवायची आहे. राज्यातील नागरिकांनी ही लाट थोपवायची की तिला निमंत्रण द्यायचे हे ठरवावे अश्या शब्दात मुख्यमंत्री उध्दव  ठाकरे यानी माझा डॉक्टर परिषदेत जनतेला साद घातली आहे. कोविडच्या  संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाने आयोजित केलेल्या "माझा डॉक्टर" या ऑनलाईन परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

  मुंबई : जर तिसरी लाट अपरिहार्य असेल, ती येऊ नये अशी आपली प्रार्थना आहे. पण प्रार्थनेच्या पुढे एक पाऊल पुढे टाकताना प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्याला तिसरी लाट येऊ द्यायची नाहीच. ती थोपवायची आहे. राज्यातील नागरिकांनी ही लाट थोपवायची की तिला निमंत्रण द्यायचे हे ठरवावे अश्या शब्दात मुख्यमंत्री उध्दव  ठाकरे यानी माझा डॉक्टर परिषदेत जनतेला साद घातली आहे. कोविडच्या  संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाने आयोजित केलेल्या “माझा डॉक्टर” या ऑनलाईन परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

  प्रार्थनेला प्रयत्नांची जोड आवश्यक

  मुख्यमंत्री म्हणाले की, आज कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात मग आज ही चर्चा कशासाठी, तर कारण जगभरातील देशात तिसऱ्या लाटेचा अनुभव कटु आहे. आकडे ही स्थिती स्पष्ट करतात. जर तिसरी लाट अपरिहार्य असेल, ती येऊ नये अशी आपली प्रार्थना आहे. पण प्रार्थनेच्या पुढे एक पाऊल पुढे टाकले पाहिजे त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. ते हे प्रयत्न आहेत असे ते म्हणाले.

  मुख्यमंत्री म्हणाले की तिसरी लाट येऊ नये आणि आलीच तर घातकता कमी करण्याची गरज आहे. ते म्हणाले की, अजूनही राज्यात दुसरी लाट कायम आहे आणि तिसऱ्या लाटेची शक्यता सांगितली जात आहे मग त्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे त्यासाठी आपण ही सज्‍ज राहिले पाहिजे.

  मुख्यमंत्री म्हणाले की, मागच्यावेळी प्रमाणे इतर राज्यातून ऑक्सीजन आणण्याची वेळ येऊ नये हा आपला प्रयत्न आहे. माणूस आजारी पडला की सर्वप्रथम आपल्या फॅमिली डॉक्टरकडे “माझा डॉक्टर” या भावनेतून जातो. कारण त्यांचा या माझा डॉक्टरवर विश्वास असतो. लस घेतली तरी सार्वजनिक ठिकाणी, चारचौघात वावरतांना काळजी घ्या, मास्क नक्की लावा. माझा डॉक्टरांनीही आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना यासंबंधी सांगून जनजागृती करावी असे ते शेवटी म्हणाले.

  लाट थोपवायची की निमंत्रण द्यायचे हे ठरवा

  गेल्यावर्षीच्या तुलनेत आता अनेक गोष्टी आपण खुल्या केल्या आहेत. गेल्यावर्षी सणवारानंतर, गणेशोत्सवानंतर दुसरी जोरदार लाट आली. यावर्षी रुग्णसंख्या याआधीच वाढतांना दिसत आहे त्यामुळे गर्दी होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. विषाणुचा रोज नवा अवतार येत आहे आणि जगाला ग्रासून टाकत आहे. आपल्याला तिसरी लाट येऊ द्यायची नाहीच. ती थोपवायची आहे. राज्यातील नागरिकांनी ही लाट थोपवायची की तिला निमंत्रण द्यायचे हे ठरवावे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घ्यावेत असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी आवाहन केले.

  read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]