क्वारंटाईनला जाणाऱ्या नागरिकांनी आपल्या घराला टाळे लावून काढला पळ

विक्रोळी: कोरोना विषाणूच्या संसर्गाने आरोग्ययंत्रणेला हादरवून सोडले आहेच, पण माणसांचे बदलते चेहरे, अस्तित्वाच्या लढाईत गळून पडणारे मुखवटे मनाचाही तळ खरवडून काढत आहेत त्यातच दिवसेंदिवस कोरोना रुगणांची

विक्रोळी: कोरोना विषाणूच्या संसर्गाने आरोग्ययंत्रणेला हादरवून सोडले आहेच, पण माणसांचे बदलते चेहरे, अस्तित्वाच्या लढाईत गळून पडणारे मुखवटे मनाचाही तळ खरवडून काढत आहेत त्यातच दिवसेंदिवस कोरोना रुगणांची मोठ्या संख्येने वाढ होताना दिसत आहे त्यामुळे कोरोना बाधितांचा संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे क्वारंटाईनसाठी घेऊन जाण्यासाठी आलेले पालिकेचे कर्मचारी व क्वारंटाईन बसला पाहून नागरिक आता घाबरून पळताना दिसत आहे असाच काहीसा प्रकार हा विक्रोळी मधील टागोरनगर परिसरात घडला आहे. 

विक्रोळी मधील कन्नमवार नगर व टागोरनगर परिसरात कोरोना बाधित रुगणांची संख्या ही १०० च्या वरती पोचली आहे व त्याचबरोबर कोरोनाबाधित मृतांचा आकडा देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे त्यातच आता २४ तासाच्या १७ नवे कोरोना बाधित रुग्ण कन्नमवार नगर व टागोरनगर मध्ये आढळून आलेअसून  त्यापैकी टागोरनगर ग्रुप नंबर १ अशोक नगर परिसरात कोरोनाबाधितांचा संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यासाठी आलेले पालिकेचे कर्मचारी व क्वारंटाईन बस हे सर्व पाहून क्वारंटाईनला जाणाऱ्या नागरिकांनी आपल्या घराला टाळे लावून पळून गेले असून त्यामुळे आता कोरोनाचा संसर्ग हा कन्नमवार नगर व टागोरनगर परिसरात कोरोना बाधितांची संख्या ही आजून मोठ्या प्रमात वाढू शकते असे स्थानिक नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी सांगितले.