... so the BJP won the election; A shower of appreciation from Chandrakant Patil

कोथरूड विधानसभा निवडणूक जिंकल्यावर चंद्रकांत पाटील यांनी खोटे शपथपत्र दाखल केले असा आरोप करत अभिषेक हरिदास यांनी भारतीय लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम १२५ (अ) अन्वये दादांच्या निवडीविरुद्ध दाद मागितली होती.फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २०२ अंतर्गत पुण्यातील फौजदारी न्यायालयात (JMFC ) याबाबतचा खटला दाखल करण्यात आला होता. न्यायाधीश जान्हवी केळकर यांनी विस्तृत निकालपत्रात आ.चंद्रकांतदादां विरुद्धचे सर्व आरोप फेटाळून लावले व सदर तक्रार काढून टाकली, सदर खटला निकाली काढला.

मुंबई : एका सामान्य गिरणी कामगाराचा मुलगा राज्यातील महत्त्वाच्या खात्यांचा मंत्री होतो,भाजपचा प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत वाटचाल करतो हे काही हितशत्रूंना मानवत नाही आणि त्यातून माझ्याविरुद्ध कुभांड रचले जाते व मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, अखेर सत्याचाच विजय होतो हे न्यायालयाच्या निकालाने दाखवून दिले असल्याचे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

अश्या आरोपांची आता सवय झाली असून अश्या खोट्या आरोपां मुळे अनावश्यक मानसिक त्रास होतो मात्र अश्या कट कारस्थानातून मी अधिक तावून सुलाखून बाहेर पडतो व समाजसेवेचे जे व्रत स्वीकारले आहे ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा सज्ज होतो असे भावनिक उदगार ही चंद्रकांत पाटील यांनी काढले.

कोथरूड विधानसभा निवडणूक जिंकल्यावर चंद्रकांत पाटील यांनी खोटे शपथपत्र दाखल केले असा आरोप करत अभिषेक हरिदास यांनी भारतीय लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम १२५ (अ) अन्वये दादांच्या निवडीविरुद्ध दाद मागितली होती.फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २०२ अंतर्गत पुण्यातील फौजदारी न्यायालयात (JMFC ) याबाबतचा खटला दाखल करण्यात आला होता.

न्यायाधीश जान्हवी केळकर यांनी विस्तृत निकालपत्रात आ.चंद्रकांतदादां विरुद्धचे सर्व आरोप फेटाळून लावले व सदर तक्रार काढून टाकली, सदर खटला निकाली काढला.

साक्षी पुराव्यांची शहानिशा तक्रारदाराच्या सर्व तक्रारींची व सोबतच्या साक्षी पुराव्यांची शहानिशा करुन न्यायालयाने निरीक्षण नोंदविताना चंद्रकांत पाटील यांच्या विरुद्धचे सर्व आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे.