मुंबईत क्लायमेट ॲक्शन प्लान तयार होत आहोत : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

टोमॅटोला भाव द्या, अन्यथा आंदोलन, खोतांचा इशारानिव्वळ घोषणांचा पाऊस पाडू नये. राज्य सरकारनं सर्कस बनू नये आणि शेतकऱ्यांसमोर विदूषक म्हणून नाचू नये. शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास भाग पाडू नका. तुम्हाला फायटर म्हणून पाठवलं नाही, प्रश्न सोडवण्यासाठी पाठवलं आहे.

  आपल्या सर्वांचाच एक अनुभव आहे की, पावसाचा वेग आणि अनुमान 2 ते 3 मिमीपेक्षा जास्त असतं. आपण मुंबईची परिस्थिती बघत आहात आणि वातावरण बदलत आहे. यामध्ये काहीच शंका नाही. उष्णता वाढत चाचली आहे. तसेच थंडी कधी असते तर कधी मध्येच दडी मारते. दिवाळीनंतर थंडी पडायची ती आता बघायलाच मिळत नाही. असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

  मुंबईत क्लायमेट ॲक्शन प्लान तयार होत आहोत. नोव्हेंबरपर्यंत सूचना घेऊन हा कृतीआराखडा तयार होईल. त्यामध्ये प्रत्येक पंचशील तत्त्वांवर काम कसं करायचं. हे बघणं गरजेचं आहे. आपल्या देशात अर्थात राज्य महाराष्ट्र म्हणून इंडस्ट्रियल स्टेट म्हणून ओळखतो. इंडस्ट्री जास्तीत जास्त फायनान्स इंडिया आहे. असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

  माझी वसुंधरा अभियानाचा दुसरा भाग सुरु झाला आहे. एमएमआरडए आणि बीएमसी मिळून हा कृतीआराखडा तयार होतोय. बीएमसीनं आता इलेक्ट्रीक गाड्या घ्यायला सुरुवात केली आहे. असं देखील ते म्हणाले.

  दशकभरात मुंबई शहर राहण्यासाठी अयोग्य

  याद्वारे तज्ज्ञ आणि नागरिक त्यांच्या सूचना, शिफारशी २० सप्टेंबर २०२१ पर्यंत पाठवू शकतील. मुंबई वातावरण कृती आराखड्याच्या अंतर्गत असलेले संकल्पनाधारीत सहा कृती मार्ग, उपाय नोव्हेंबर 2021 पर्यंत म्हणजेच संयुक्त राष्ट्रे वातावरण बदल परिषदेच्या (युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉनफरन्स – COP26) नजीकच्या काळात तयार होण्याची शक्यता आहे.

  यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, आत्ता हीच वेळ कृती करण्याची असून, त्यात दिरंगाई झाली तर पुढील दशकभरात मुंबई शहर राहण्यासाठी अयोग्य ठरेल. ‘मुंबईच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी करतानाच वातावरण बदलांबाबतची कृती मुख्य प्रवाहात आणल्यामुळे शहरातील नैसर्गिक रचनेचे संरक्षण, संवदेनशील समूहाची सक्षमता वाढवणे आणि शहराची समृद्ध वाढ होणे शक्य होऊन शहरातील हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात प्रभावी घट करता येईल.’ असे ते म्हणाले.

  वातावरण बदलाचे आव्हान हाताळण्यासाठी व्यापक आणि सर्वसमावेशक असे धोरण तयार करणे हे या आराखड्याचे मुख्य उद्दीष्ट असल्याचे ठाकरे यांनी यावेळी मांडले. त्यासाठी वातावरण बदलाचे धोके कमी करणारे ठोस, प्रभावी आणि सर्वसमावेशक असे अनुकूल धोरण स्वीकारले जाईल.

  या कार्यक्रमासाठी ठाकरे यांच्याबरोबर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त आयएस चहल, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, सी ४० सिटीजच्या दक्षिण आणि पश्चिम अशिया विभागाच्या विभागीय संचालक श्रुती

  नारायण, डब्ल्यूआरआयचे कार्यकारी संचालक माधव पै आणि डब्ल्यूआरआय इंडिया रॉस सेंटर ऑफ सस्टेनेबल सिटीजच्या सहयोगी संचालक लुबैना रंगवाला, राज्याचे पर्यावरण व पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री यांचे संशोधन व धोरण सचिव (खासगी) सौरभ पुनमिया आणि महानगरपालिकेचे उप आयुक्त (पर्यावरण) सुनिल गोडसे हे उपस्थित होते.

  मुंबई वातावरण कृती आराखडा

  हा आराखडा सहा प्रकारच्या कृती मार्गांवर, उपायांवर लक्ष्य केंद्रीत करतो. ज्यायोगे विविध क्षेत्रांच्या अनुषंगाने धोके कमी करणाऱ्या अनुकूल अशा विशिष्ट धोरणामुळे अंमलबजावणी करण्याजोगे वातावरण प्रकल्प शहराच्या सक्षमतेत मदत करतील. घन कचऱ्याचे शाश्वत व्यवस्थापन, शहरातील हिरवळ आणि जैवविविधता, शहरातील पूर आणि जलस्रोतांचे व्यवस्थापन, उर्जा कार्यक्षमतेची उभारणी, स्वच्छ हवा आणि शाश्वत वाहतूक यंत्रणा हे सहा संकल्पनाधारीत कृती मार्ग आहेत.

  बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आयएस चहल म्हणाले, “वातावरणीय बदलाच्या ताज्या घडामोडी पाहील्या तर आपल्या विचारात बदल करण्याची गरज आहे. नोंदी आणि माहितीवर देखरेख आणि व्यवस्थापन हे अचूक माहितीवर आधारलेले तातडीचे निर्णय घेण्यास उपयुक्त ठरेल. जेणेकरुन शहरातील सर्वाधिक संवेदनशील घटकांच्या सुरक्षेची खात्री देता येईल. कोरोना महामारीमध्ये मुंबईचा दृष्टीकोन असाच होता.”

  पुढील काळात पूर्णपणे इलेक्ट्रीक बसगाड्या

  यापुढील काळात पूर्णपणे इलेक्ट्रीक बसगाड्या खरेदी अथवा भाडेतत्वावर घेतल्या जातील असे नुकतेच बृहन्मुंबई इलेक्ट्रीक सप्लाय आणि ट्रान्सपोर्टने (बेस्ट) जाहीर केले आहे. 2022च्या अखेरीपर्यंत बेस्टच्या बस ताफ्यातील 45 टक्के वाहने ही इलेक्ट्रीक असतील अशी बेस्टला अपेक्षा आहे. तसेच हवा प्रदूषण कमी करण्यासाठी डिझेलवर धावणाऱ्या 250 बसगाड्यांचे रुपांतर कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) आधारीत करण्याची बेस्टची योजना आहे.

  याशिवाय शहराच्या लांबीरुंदी व्याप्तीच्या अनुंषगाने रस्त्यांचे चांगले जाळे तयार असण्यावर बृहन्मुंबई महानगरपालिकेने लक्ष केंद्रीत केले आहे, जेणेकरुन पंधरा मिनिटातील क्लस्टर्स सक्षम होतील. याशिवाय संपूर्ण शहरात पाच हजार ठिकाणी पर्जन्य जलसंचयाची सुविधा (रेनवॉटर हार्वेस्टिंग पिट्स) तयार करण्याची योजना असून. त्यापैकी अनेक मोठे प्रकल्प हे शहराच्या मध्यभागी असणार आहेत. जेणेकरुन वाहून जाणाऱ्या पावसाचे पाणी पिण्याव्यतिरिक्तच्या अन्य वापरासाठी साठवता येईल.