देशमुख आणि वाझे भेटीचे पुरावेच नाहीत? CBI कडून क्लिनचिट? राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांच्या उलट-सुलट प्रतिक्रिया

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात शंभर कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप केल्यानंतर प्राथमिक चौकशी अहवालात सीबीआयने देशमुखांना क्लिनचिट दिल्याचा अहवाल समूह माध्यमांमध्ये व्हायरल झाला. अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्यात भेट झाल्याचे पुरावे नाहीत, असे या सीबीआयच्या कथित अहवालात नमूद करण्यात आले आहे. याबाबत सीबीआयकडून  मात्र कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. रविवारच्या दिवशी हा अहवाल आल्याचे सांगत सीबीआय आता याबाबत सत्य लोकांसमोर आणेल असे राष्ट्रवादीचे प्रवक्ता मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

  मुंबई : केंद्रीय गुन्हा अन्वेषण ब्यरो (सीबीआय)ने प्राथमिक चौकशी अहवालात माजी गृहमंत्री अनिल देशमूख यांना क्लिनचिट दिल्याचा एक अहवाल समूह माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यांनतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली. त्यावर भाजप आणि राष्ट्रवादीमधून प्रतिक्रिया सुरू झाल्या. अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्यात भेट झाल्याचे पुरावे नाहीत, असे या अहवालात नमूद केल्याचे सांगत क्लिन चिट असल्याचे सांगण्यात येत आहे.

  देशमुख आणि वाझे भेटीचे पुरावे नाही

  माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात शंभर कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप केल्यानंतर प्राथमिक चौकशी अहवालात सीबीआयने देशमुखांना क्लिनचिट दिल्याचा अहवाल समूह माध्यमांमध्ये व्हायरल झाला. अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्यात भेट झाल्याचे पुरावे नाहीत, असे या सीबीआयच्या कथित अहवालात नमूद करण्यात आले आहे. याबाबत सीबीआयकडून  मात्र कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. रविवारच्या दिवशी हा अहवाल आल्याचे सांगत सीबीआय आता याबाबत सत्य लोकांसमोर आणेल असे राष्ट्रवादीचे प्रवक्ता मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

  त्या अधिका-यांचीच चौकशी सुरू

  या अहवालात ही प्राथमिक चौकशी बंद करावी, अशी शिफारस ही चौकशी करणारे सीबीआयचे उपअधीक्षक आर. एस. गुंजाळ यांनी आपल्या ६५ पानी अहवालात केल्यानंतरही सीबीआयने देशमुखांवर गुन्हे दाखल केल्याचे म्हटले आहे आता सीबीआयच्या त्या अधिका-यांचीच चौकशी सुरू केल्याचे वक्तव्य खा सुप्रिया सुळे यांनी कालच केले होते. त्यानंतर अश्या प्रकारे एका केंद्रीय यंत्रणेत वरिष्ठ कनिष्ठ अधिका-यांचीच चौकशी एखाद्या प्रकरणात कशी करतात असा सवाल त्यानी केला होता. मात्र याबाबत कथित अहवाल अधिकृतपणे जाहीर झाला नाही.

  सर्वस्वी जबाबदारी सीबीआयची

  आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लीनचीट दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या असून यावर नवाब मलिक यांनी सीबीआयला जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. हा अहवाल सीबीआयच्या फाईलमधील किंवा खात्यातंर्गत आहे की बनावट करुन तो वायरल करण्यात आला आहे याची सर्वस्वी जबाबदारी सीबीआयची आहे असेही नवाब मलिक म्हणाले.  या देशात खोट्या बातम्यांचा वायरससारखा फैलाव होतोय. शासनकर्ते सगळी सत्य माहिती देत नाही ती मिडियाने शोधून काढली पाहिजे ही मिडियाची जबाबदारी असल्याचे देशाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

  राजकीय सूडबुध्दीने कुठलीही कारवाई होवू शकत नाही

  ते म्हणाले की, हा विषय गंभीर आहे. एखाद्या व्यक्तीवर आरोप झाले. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जर हे कागद सत्य आणि त्या फाईलमधील असतील तर यापेक्षा राजकीय सूडबुध्दीने कुठलीही कारवाई होवू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाचा आणि ही बातमी खोटी आहे याबाबतचा खुलासा सीबीआयने करावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

  वाचविण्याचे स्टंट सुरू

  तर भाजपचे नेते डॉ सोमैय्या यानी अनिल देशमुख फसले आहेत त्यानी वाचविण्याचे स्टंट सुरू केले आहेत, या प्रकरणात कोणत्याच न्यायालयात त्याना दिलासा मिळू शकला नाही त्यामुळे त्याना अटक अटळ आहे त्याच्या सा-या घोटाळ्यांसोबतच रश्मी शुक्ला प्रकरणाचीही चौकशी होणार आहे असे म्हटले आहे.