पुन्हा दाटतायत कोरोनाचे ढग ; अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा वाढतोय

गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेने एक अहवाल तयार केला आहे. ज्यात ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता  व्यक्त करण्यात आली आहे.

    मुंबई: गणेशोत्सवाच्या आनंदमय सोहळ्याला आजपासून सुरुवात होत आहे. यंदाही सर्वत्र साधेपणानेच गणेशोत्सव साजरा केला जात आहे. मात्र दुसरीकडे
    राज्यातील कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा म्हणजे उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा पुन्हा ५० हजार पार गेला आहे. तर बऱ्या होणाऱ्या रुग्णांचंही प्रमाण कमी झालं आहे. राज्यातील कोरोना अॅक्टिव रुग्णांचा आकडा कमी-जास्त होत होता पण तो ५०हजारांच्या खालीच होता. आज मात्र अ‍ॅक्टिव्ह रुग्णांनी ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात काल रात्रीपर्यंत ४,२१९ नव्या रुग्णांची नोंद झाली आणि अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५०,२९९ वर पोहोचली आहे.

    दरम्यान, तज्ज्ञांच्या मते, ऑक्टोबरमध्ये देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेने एक अहवाल तयार केला आहे. ज्यात ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता  व्यक्त करण्यात आली आहे.