udhav thackrey

मुंबई :  ग्रामपंचायती निवडणुका जिंकण्यासाठी शिवसेना तयारीला लागली आहे. ग्रामपंचायती जिंकण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. ‘वर्षा’ बंगल्यावर शिवसेनेची रणनिती आखली जातेय.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांशी चर्चा (Shiv Sena meeting)  करुन ग्राम पंचायत निवडणुकीत शिवसेनेला नंबर वन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर शनिवारी मुख्यमंत्र्यांनी  शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी संपर्कप्रमुखांना रणनीती बनवण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्रातील १४ हजार २३४ ग्राम पंचायतींच्या निवडणुका शिवसेना लढवणार आहे. १५ जानेवारी २०२१ रोजी राज्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे.

राज्यातील ३४ जिल्ह्यातील १४  हजार २३४ गावातील ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. त्यासाठी शिवसेनेनं कंबर कसली आहे. सर्व ग्रामपंचयातीत शिवसेनेनं त्यांच्या संपर्कप्रमुखांना रणनीती आखून सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.