CM orders action against Pohardevi fort Demonstration will cost Sanjay Rathore dearly

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवी गडावरील गर्दीबाबत गंभीर दखल घेतली आहे. कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

    मुंबई : वनमंत्री संजय राठोड यांच्या पोहरादेवी दौऱ्यात कोरोनाचे नियम पायदळी तुडवण्यात आले. संजय राठोड यांना हे शक्तीप्रदर्शन महागात पडणार आहे. नियम सर्वांना सारखेच असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवी गडावरील गर्दीबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

    एकीकडे मुख्यमंत्री मास्क घाला, असं अवाहन करतात तर दुसरीकडे शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत संजय राठोड गर्दी करत आहेत. हा गंभीर प्रकार आहे. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करुन ठाकरी बाणा दाखवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली होती.

    संजय राठोड यांच्या स्वागतासाठी पोहरोदेवी येथे हजारोच्या संख्यने गर्दी झाली होती. जमलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची गंभीर दखल घेतली असून कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

    वाशीम जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याचा अहवाल देण्यास सांगण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत. राज्यातही कोविड परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वर्षा येथे एका बैठकीत आढावा घेतला तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आयुक्तांशी देखील संसर्ग रोखण्यासंदर्भात करीत असलेल्या उपाय योजनांबाबत मार्गदर्शन केले.