मुख्यमंत्र्यांचा आज जनतेशी संवाद, लॉकडाऊनबाबत बोलण्याची शक्यता, लसीकरणाबाबतच्या घोषणेकडे लक्ष

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. आज (शुक्रवारी) संध्याकाळी मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे. राज्यातील लॉकडाऊनची सद्यस्थिती, रुग्णवाढीचा दर आणि पुढील १५ दिवसांतील निर्बंध याबाबत मुख्यमंत्री काय बोलतात, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

    देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून दिवसेंदिवस नव्या कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चाललाय.  सध्या दररोज साडे तीन लाखांपेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण सापडत असून महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळण्याचा सिलसिला अद्यापही सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लावण्यात आलेले कडक निर्बंध आणखी १५ दिवसांनी वाढवण्याची घोषणा कऱण्यात आलीय.

    या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. आज (शुक्रवारी) संध्याकाळी मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे. राज्यातील लॉकडाऊनची सद्यस्थिती, रुग्णवाढीचा दर आणि पुढील १५ दिवसांतील निर्बंध याबाबत मुख्यमंत्री काय बोलतात, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. याची वेळ अद्याप मुख्यमंत्री कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेली नाही.

    दरम्यान, १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकऱणाची घोषणा करण्यात आली असली, तरी महाराष्ट्रात अद्याप लसी उपलब्ध नसल्याने केवळ ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठीच लसीकऱण सुरू आहे. महाराष्ट्राने मोफत लसीकरणाचं आश्वासन दिलं असलं तरी लसीचं उपलब्ध नसल्यामुळे अनेक लसीकऱण केंद्रं बंद आहेत. याबाबतही मुख्यमंत्री काय भूमिका मांडतात, याकडं सर्वांचं लक्ष असणार आहे.

    लॉकडाऊनचा कालावधी वाढणार असल्यामुळे व्यापारी आणि उद्योजकांचं धाबं दणाणलंय. हातावर पोट असणाऱ्या नागरिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे. गेल्या वेळी निर्बंध लागू करताना मुख्यमंत्र्यांनी काही समाजघटकांना मदतीची घोषणा केली होती. यावेळी तशी काही घोषणा होते का, याकडेही लक्ष असणार आहे.