
बोगदा खणणारं मावळा मशीन (टीबीएमचा) हे या प्रकल्पातील महत्त्वाचं साधन आहे. हे मशीन १२.१९ मीटर व्यासची आहे. हे भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठ्या व्यासाचे टीबीएम मशीन आहे. या टीबीएम मशीनला मावळा असं नाव देण्यात आलं आहे.
कोस्टल रोडच्या बोगद्याचे खोदकाम करणाऱ्या अजस्त्र बोरिंग मशिनचा शुभारंभ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रियदर्शिनी पार्क येथे करण्यात आला. सोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे , मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोरोनाच्या लढाईत मुंबई महानगरपालिकेने जगाने दखल घ्यावे असे काम केले आहे. आता मुंबईकरांच्या विकासाच्या लढाईतही आपण असे पुढेच राहू. त्यासाठी या लढाईत अशा अनेक “मावळ्यांची” कामगिरी महत्त्वाची ठरेल. माझी मुंबई आणि माझी महानगरपालिका हा मुंबईकराचा अभिमान आहे. त्यामुळे मुंबईच्या विकासासाठी जगात उपलब्ध असलेले सर्वोत्त्म असे जे जे तंत्रज्ञान, विज्ञान असेल ते आणण्याची आपली परंपरा राहिलेली आहे. यापुढेही ही परंपरा अशीच चालू ठेवणार आहोत.
Maharashtra CM Uddhav Thackeray launches Coastal Road Tunnel Boring Machine at Priyadarshini Park in Mumbai.
State Minister Aditya Thackeray is also present. pic.twitter.com/bA0n5mQwuA
— ANI (@ANI) January 11, 2021
मुंबईच्या दृष्टीने आजचा हा समाधान देणारा आणि महत्त्वाचा क्षण आहे. २०१२ पूर्वीच आपण या समुद्री मार्गाची संकल्पना माडंली होती. वांद्रे- वरळी सी-लिंकलाच पुढे जोडणारा हा मार्ग असेल, अशी संकल्पना होती. मुंबईला सुंदर असा समुद्र किनारा लाभला आहे. समुद्राच्या या क्षितीजावर समुद्री मार्गही शोभून दिसणारा आहे. यासाठी आपण अप्रतिम असे नियोजन केले होते. कामही धुमधडाक्यात सुरु केले होते. मध्येच कोरोनाचे संकट आले. अजूनही ते गेलेले नाही. तरीही अनेक गोष्टी ठप्प झाल्या असतानाही, या कोस्टल रोडचे काम मंदावू दिलेले नाही.
कोणत्याही कामाचे पुढे नेताना केवळ नेता असून भागत नाही. त्यासाठी लढवय्ये मावळ्यांची गरज असते. तसे या कामात हा हे मावळा यंत्राचे काम असेल. रणांगणात मावळाच लढत असता. तसे या मुंबई महापालिकेच्या या कामात आयुक्तांपासून ते वरीष्ठ अधिकारी, तज्ज्ञ, हे काम करणारी कंपनी, अभियंते, कर्मचारी हे सगळेच असे मावळे आहेत.
१९९५-९९ मध्ये युती सरकारच्या काळात वाहतुकीची समस्या जाणवू लागताच आपण मुंबईत ५५ उड्डाण पूल उभे केले. आता तेही पूल कमी पडायला लागले आहेत. उपनगरातील जनतेला थेट शहरात अधे-मधे न थांबता यायचे झाल्यास आता हा समुद्री मार्ग उपयुक्त ठरणार आहे. त्यांचा प्रवासही नयन रम्यही होणार आहे. मुळात या समुद्री मार्गात भूयारी मार्गाच मोठ्या लांबीचा आहे. त्याा कामाची आप आज सुरवात करणार आहोत. हा भुयारी मार्ग थेट मलबार हिल खालून, गिरगाव चौपाटीवर निघणार आहे. हे काम लवकरावत लवकर म्हणजे नियोजित वेळेच्या आधीच पूर्ण होईल, असा विश्वास आहे. उपनगरांतून येणाऱ्या मुंबईकरांसाठी तो लवकरात लवकर वापरात येईल, अशी आशा आहे. या कामांसाठी सर्वांनाच शुभेच्छा.
मावळा मशीन नेमके काय आहे?
बोगदा खणणारं मावळा मशीन (टीबीएमचा) हे या प्रकल्पातील महत्त्वाचं साधन आहे.

हे मशीन १२.१९ मीटर व्यासची आहे. हे भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठ्या व्यासाचे टीबीएम मशीन आहे. ११ मीटर बोगद्यात सर्व सुरक्षेची व्यवस्था असेल. या टीबीएम मशीनला मावळा असं नाव देण्यात आलं आहे. अरबी समुद्राखालील तब्बल १७५ एकर जमिनीवर भराव टाकण्यात आला आहे. तर अजून १०२ एकर समुद्राखालील जमिनीवर भराव टाकण्यात येणार आहे. इतकंच नाही तर या मार्गावर समुद्राखालून ४०० मीटरचे बोगदे असतील. हे बोगदे खोदण्यासाठी मावळा हे मशीन आणलं आहे.