मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी करणार दिल्ली वारी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. महाराष्ट्रातील कोविड १९ संसर्ग परिस्थिती, लसीकरण, GST परतावा या संदर्भात महत्वाची चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  मुंबई : कोरोनाशी (Coronavirus) सामना करत असताना राज्य सरकारला (MVA Government) अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना वेळोवेळी पत्र लिहून अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या. पण आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) दिल्लीत जाऊन मोदींची भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. महाराष्ट्रातील कोविड १९ संसर्ग परिस्थिती, लसीकरण, GST परतावा या संदर्भात महत्वाची चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीही पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून राज्यासाठी मदत मागितली होती. पण अजूनही केंद्राकडून पुरेशी मदत मिळाली नसल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. एवढंच नाहीतर हक्काचा असलेला जीएसटीचा परतावा सुद्धा केंद्र सरकारने अद्याप दिलेला नाही, त्यामुळे काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी याबद्दल मागणी केली होती. आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला जाणार आहे.

  मुख्यमंत्री झाल्यानंतर दिल्लीला पहिल्यांदाच भेटीसाठी जाणार

  विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर नवी दिल्लीत ही पहिलीच भेट असणार आहे. दीड वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांनी भाजपला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्यामुळे भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले.

  दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती. या भेटीआधी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल नाराजी बोलून दाखवली होती. त्यांची तक्रार शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानी घातली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली होती.

  परंतु, त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली आहे. सिल्व्हर ओक बंगल्यावर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट सुद्धा घेतली. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत, त्यामुळे या भेटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

  cm uddhav thackeray will visit delhi and meet pm narendra modi to discuss various issues of the maharashtra