Uddhav Thackeray

जनतेच्या कल्याणासाठी सुरू असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत, असं सांगत पुणे आणि नागपूरच्या अधिकाऱ्यांने कान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टोचले. वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकांना उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, अपर मुख्य सचिव  आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते.

मुंबई  : पुणे आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सुरु असलेल्या विविध विकासकामांचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. विकास प्रकल्प पूर्ण करताना कालबद्ध मर्यादेत तो पूर्ण करावा. जेणेकरुन नागरिकांना त्याचा लाभ मिळेल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकांना उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, अपर मुख्य सचिव  आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते.

पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत ९६० कोटी रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. एकूण निधीपैकी सुमारे ५३ टक्के निधी मेट्रोसाठी खर्च करण्यात येत आहे. प्राधिकरणाच्या हद्दीतील प्रकल्पांसाठी लागणाऱ्या जमिनींचे मूल्यांकन करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय यावेळी झाला. त्याचबरोबर सामाजिक उत्तरदायित्व निधीतून प्रकल्प करण्याबाबत नियोजन करण्यासाठी सुकाणू समितीदेखील नेमण्याचे यावेळी निर्णय झाला. यावेळी प्राधिकरणाचे महानगर आयुक्त सुहास दिवसे यांनी सादरीकरण केले.

नागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्या कामांचे सादरीकरण महानगर आयुक्त शितल उगले यांनी केले. आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे पूर्ण झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सध्या प्राधिकरणामार्फत सुमारे १५०० कोटी रुपयांचे विकास प्रकल्प सुरु असून त्यात विकासकामांसोबतच सौंदर्यीकरणावरही भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर येथे मुलींसाठी संत चोखामेळा वसतीगृह उभारण्यात येत असल्याचे यावेळी सादरीकरणादरम्यान सांगितले.

बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवासन आदी यावेळी उपस्थित होते.