Appointment of Ajoy Mehta, Principal Advisor to the Chief Minister, as Chairman, Maharashtra Real Estate Regulatory Authority (Maharashtra)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार अजोय मेहता आयकर विभागाच्या रडारावर असल्याचे बोलले जात आहे. मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त अजोय मेहता यांच्या नरिमन पॉईंट येथील फ्लॅटवर आयकर विभागाची नजर खिळली आहे. आयकर विभाग कधीही मेहता यांच्या बंगल्यावर धाड मारू शकते, अशी माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेहता यांनी नरिमन पॉईंट परिसरातील फ्लॅट खरेदी केला होता. हा फ्लॅट शेल कंपनी अनामित्र प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेडकडून खरेदी करण्यात आल्याचे समोर आले आहे. या कंपनीचे दोन भागधारक आहेत. आता आयकर विभागाच्या रडारावर मेहता यांचा हा प्लॅट आहे.

    मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार अजोय मेहता आयकर विभागाच्या रडारावर असल्याचे बोलले जात आहे. मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त अजोय मेहता यांच्या नरिमन पॉईंट येथील फ्लॅटवर आयकर विभागाची नजर खिळली आहे. आयकर विभाग कधीही मेहता यांच्या बंगल्यावर धाड मारू शकते, अशी माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेहता यांनी नरिमन पॉईंट परिसरातील फ्लॅट खरेदी केला होता. हा फ्लॅट शेल कंपनी अनामित्र प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेडकडून खरेदी करण्यात आल्याचे समोर आले आहे. या कंपनीचे दोन भागधारक आहेत. आता आयकर विभागाच्या रडारावर मेहता यांचा हा प्लॅट आहे.

    जुलै 2020 पासून अजोय मेहता मुख्यमंत्री ठाकरे यांचे मुख्य सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. यासाठी त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात 603 क्रमांकाचे दालन आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक, प्रशासकीय, यंत्रणा परत वेगाने सुरू करण्यासाठी व्यापक आणि दीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्री सचिवालयात नितांत आवश्यकता असल्याने मेहता यांना निवृत्तीनंतर प्रधान सल्लागार हे पद देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला.