मुख्यमंत्र्यांचा ‘नौटंकी दौरा’ सरकारच्या तिजोरीत लोकांना देण्यासारखे काहीच नाही : माजी मुख्यमंत्री राणेंचा प्रहार

राणे म्हणाले की, कोकणाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी काय दिले? मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत पॅकेज का जाहीर केले नाही? ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा म्हणजे नुसता फेरफटका आणि 'नौटंकी दौरा होता.  ते म्हणाले की, कोकणच्या दौ-यासाठी मुख्यमंत्र्यानी किती वेळ दिला? "केवळ तीन तासाच्या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. पण या वादळात किती लोकांचे नुकसान झाले, किती जणांचे रोजगार गेले याची माहिती लोकांकडून घेतली नाही. मुख्यमंत्र्यानी लोकांची का भेट घेतली नाही?"

    मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यानी मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा हा ‘नौटंकी दौरा’ असल्याची टिका केली आहे. सरकारच्या तिजोरीत लोकांना देण्यासारखे काहीच नाही अशी टिका करताना माजी मुख्यमंत्री नारायण राणे म्हणाले की, जनाची नाही आणि मनाचीही नाही असे हे सरकार आहे. या सरकारच्या प्रत्येक खात्यात भ्रष्टाचार असून लवकरच तो आपण उघडकीस आणणार असल्याचा इशाराही राणे यांनी दिला आहे.

    नुसता फेरफटका आणि ‘नौटंकी दौरा

    राणे म्हणाले की, कोकणाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी काय दिले? मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत पॅकेज का जाहीर केले नाही? ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा म्हणजे नुसता फेरफटका आणि ‘नौटंकी दौरा होता.  ते म्हणाले की, कोकणच्या दौ-यासाठी मुख्यमंत्र्यानी किती वेळ दिला? “केवळ तीन तासाच्या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. पण या वादळात किती लोकांचे नुकसान झाले, किती जणांचे रोजगार गेले याची माहिती लोकांकडून घेतली नाही. मुख्यमंत्र्यानी लोकांची का भेट घेतली नाही?”

    आश्वासनामध्ये स्पष्टता नाही

    राणे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत पॅकेज का जाहीर केलं नाही?  त्यामुळे त्यांच्या आश्वासनामध्ये स्पष्टता नाही अशी टीका नारायण राणे यांनी केली. ते म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी कोकणाला एक तरी प्रकल्प दिला का? पर्यटनासाठी काय दिले, किती विकास केला हे सांगावे. भावनिक विषयावर गोड-गोड बोलून कोकणची फसवणूक केली जाते असे ते म्हणाले. राणे म्हणाले की, राज्याच्या प्रत्येक खात्यात भ्रष्टाचार चालला असून तो उघड करणार आहे. मंत्रालयात केवळ टक्केवारीसाठी कामे चालतात.

    कोरोनाच्या औषधांच्या टेंडरमध्ये पैसे खाल्ले जात आहेत. संजय राऊतांनी हे जाहीर करावे अन्यथा मी जाहीर करेन. पोलीस वसाहतीच्या टेंडरमध्येही भ्रष्टाचार झाला असून प्रत्येक खात्यात चाललेला भ्रष्टाचार नावानिशी उघड करणार आहे.

    माजी मुख्यमंत्री भाजप नेते नारायण राणे