वीज पुरवठा खंडित प्रकरणी मुख्यमंत्र्यांची ‘हाय व्होल्टेज’ बैठक सुरु

अचानक लाईट गेल्यामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले होते. आजची वीज पुरवठा खंडित परिस्थितीची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांची तातडीची उच्चस्तरिय बैठक सुरु असून संपूर्ण स्थितीचा आढावा घेऊन पुढील पाऊल उचलले जाणार असल्याचे कळते.

मुंबई: मुंबई आणि उपनगरातील वीजपुरवठा १० वाजल्यापासून बंद होता. जवळपास अडीच तासांपेक्षा अधिक काळाने हा पुरवठा सुरु झाला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई परिसरातील वीजपुरवठा हळूहळू सुरु होत आहे. वीजपुरवठा सुरळीत झाल्याने ठप्प झालेली लोकल रेल्वेची वाहतूकही पूर्वपदावर येत आहे.ग्रीड फेल्युअरमुळे हा बिघाड झाला होता. अचानक लाईट गेल्यामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले होते. आजची वीज पुरवठा खंडित परिस्थितीची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांची तातडीची उच्चस्तरिय बैठक सुरु असून संपूर्ण स्थितीचा आढावा घेऊन पुढील पाऊल उचलले जाणार असल्याचे कळते.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीस ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे , ऊर्जा सचिव असीम गुप्ता उपस्थित आहेत.आजच्या परिस्थितीला नेमकं कोण जबाबदार आहे?, हा केवळ तांत्रिक दोष आहे की, यामागे दुसरे काही कारण आहे?, भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून कोणती खबरदारी घ्यायला हवी?, या सर्व मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा सुरु असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.