मुख्यमंत्र्यांचे वर्क फ्रॉम होम, मंत्रालयात दालन बंद असल्याने कार्यालयाच्या आमदाराकडून दरवाज्यावर निवेदन चिकटवून निषेध 

कोरोनाची मदत गरजूना मिळत नाही शासकीय अधिकारी दाद देत नाहीत आणि मुख्यमंत्री भेट त नाही त्यामुळे ही दाद आता दरवाजावर चिकटवून मिळते का ते पाहण्यासाठी निवेदन चिकटवले आहे

  मुंबई: युवा स्वाभिमान पक्षाचे नेते आणि अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी व्टिट करत माहिती दिली आहे की, त्यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री लोकप्रतिनीधीना भेटत नसल्याने त्यांच्या कार्यालयाच्या दरवाज्यावर निवेदन चिकटवून निषेध करत न्याय मागितला आहे.

  मुख्यमंत्र्यांचे वर्क फ्रॉम होम
  गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर मंत्रालयात उपस्थिती कमी करण्याचे आदेश देण्यात आले त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंत्रालयातील कार्यालया ऐवजी काही काळ मातोश्री आणि नंतर वर्षा निवास स्थानातून वर्क फ्रॉम होम करत आपले कामकाज सुरू ठेवले आहे. मात्र त्यामुळे मुख्यमंत्री लोकप्रतिनीधी मंत्री अधिकारी आणि पत्रकरांना देखील क्वचित भेटतात अश्या तक्रारी येत आहेत.

  वर्षभरापासून दालन बंदच
  मुख्यमंत्री गेल्या वर्ष सव्वा वर्षापासून सा-या बैठका दूरस्थ प्रणालीच्या आधारे करत असून ते प्रत्यक्ष फार कमी बैठकांना हजर राहतात. त्यामुळे त्यांना भेटून जनतेच्या प्रश्नांची गा-हाणी सांगता येत नाहीत असा अनुभव सा-याच आमदाराना येत आहे. विरोधकांनी याबाबत मुख्यमंत्र्याना अनेकदा लक्ष्य केले आहे मात्र यासंदर्भात मुख्यमंत्री घरूनच काम करण्याबाबत टाम राहिले आहेत. त्यामुळे राणा यांनी या बाबीवर बोट ठेवत निवेदन मंत्रालयाच्या दालनाच्या दारावर चिकटवले आहे.

  दोघे एकमेकाचा चेहरा पाहू शकले नाहीत.
  कायदेशीर नोटीसांना प्रत्यक्ष हजर राहून प्रतिसाद न देणा-यांच्या घराच्या दरवाज्यावर अश्या प्रकारे शासकीय यंत्रणा किंवा न्यायालयाचे बेलीफ नोटीस देतात  तसेच राण यांनी नोटीस दिल्याचे म्हटले आहे. राण यांनी म्हटले आहे की मुख्यमंत्री आणि दालन दोघे एकमेकाचा चेहरा पाहू शकले नाहीत त्यानी म्हटले आहे की कोरोनाची मदत गरजूना मिळत नाही शासकीय अधिकारी दाद देत नाहीत आणि मुख्यमंत्री भेट त नाही त्यामुळे ही दाद आता दरवाजावर चिकटवून मिळते का ते पाहण्यासाठी निवेदन चिकटवले आहे.