सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले केंद्रीय सहकार खात्याच्या निर्मितीबद्दल स्वागत!

केंद्र सरकारलाही आता सहकारवर लक्ष केंद्रित करावेसे वाटले, त्यासाठी मंत्रालय निर्माण केले ही बाब स्वागतार्ह आहे. ते म्हणाले की देशात राज्याचा सहकारक्षेत्राचा साठ टक्के वाटा आहे. त्यामुळे राज्यातील सहकाराच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी या खात्याचा नक्कीच चांगला उपयोग करता येणार आहे.

    मुंबई : राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी नव्या केंद्रीय सहकार खात्याच्या निर्मितीबद्दल स्वागत केले आहे. ते म्हणाले की केंद्र सरकारलाही आता सहकारवर लक्ष केंद्रित करावेसे वाटले, त्यासाठी मंत्रालय निर्माण केले ही बाब स्वागतार्ह आहे. ते म्हणाले की देशात राज्याचा सहकारक्षेत्राचा साठ टक्के वाटा आहे. त्यामुळे राज्यातील सहकाराच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी या खात्याचा नक्कीच चांगला उपयोग करता येणार आहे.

    पीक कर्ज वाटप उद्दिष्ट पूर्ण करणार

    सहकार मंत्री म्हणाले की, राज्यात पीक कर्ज वाटप पूर्ण करावे, उद्दिष्ट पूर्ण करावे यावर सध्या राज्यांच्या सहकार विभागाचे लक्ष आहे. जिल्हा बँक उद्दिष्ट पूर्ण करतात मात्र खाजगी बँक करत नाही, त्यामुळे खाजगी बँकांनी किती कर्ज वाटप केले याचा दोन आठवड्यात आढावा घ्यायला सांगितले आहे अशी माहिती त्यांनी दिली.  ते म्हणाले की, सरकारी खाती या बँकेतून कमी करण्याचाही विचार आहे.