coastal road tunnel

पालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांचा(Mumbai) प्रवास सुसाट करणारा आणि वाहतूक कोंडीतून(Traffic Jam) मुक्त करणाऱ्या कोस्टल रोडचे (Costal Road)काम सध्या प्रगतीपथावर आहे.

    मुंबई: कोस्टल रोडच्या(Coastal Road) कामातील महत्त्वाचा टप्पा असणारे दोन मोठे बोगदे खोदण्याचे(Coastal Road Tunnel) काम ‘मावळा’ टनेल मशीन वेगाने करत आहे. प्रियदशर्नी पार्क ते गिरगाव चौपाटीपर्यंत जमिनीखाली प्रत्येकी २ किमी असणाऱ्या या दोन बोगद्यांपैकी एका बोगद्याचे २५ टक्के काम(Tunnel Work Completed 25 Percent) पूर्ण झाले आहे. दोन महिन्यांत एका बोगद्याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

    पालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांचा(Mumbai) प्रवास सुसाट करणारा आणि वाहतूक कोंडीतून(Traffic Jam) मुक्त करणाऱ्या कोस्टल रोडचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. १३ हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणा‍ऱ्या पालिकेच्या या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाचे ३६ टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे.

    प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकपर्यंतच्या १०.५८ किमीच्या या कामात २.०७ किमीचे दोन मोठे बोगदे अत्याधुनिक ‘मावळा’ नावाच्या टनेल बोअरिंग मशीनने खोदण्यात येत आहेत. जमिनीखाली १० ते ७० मीटर खाली हे बोगदे खोदत असताना मोठ्या प्रमाणावर खडक फोडले जात आहेत. बोगदे खोदण्यासाठी चीनमधून आणले गेलेले देशातील सर्वात मोठे टनेल मशीन २३०० टन वजनाचे असून याची उंची तब्बल इमारतीच्या तीन मजल्यांइतकी आहे.

    स्वयंचलित टनेल बोअरिंग मशीनने बोगद्याच्या खोदकामातील डेब्रिज स्वयंचलित पद्धतीनेच बाहेर पडणार आहे. या बोगद्याच्या खोदकामात निघणार्या खडीचा वापर रस्त्यासाठी, दगड-मातीचा उपयोग भरावासाठी करण्यात येत आहे.

    आता एका मोठ्या बोगदयाचे काम २५ टक्के झाले असून ते पूर्ण व्हायला दोन महिने लागतील त्यानंतर दुसऱ्या बाेगद्याचे काम हाती घेतले जाईल, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. ताैक्ते चक्रीवादळातही काम सुरू होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा ड्रीम प्रोजेकट असून तो वेळेत पूर्ण करण्यासाठी पालिका जोरात तयारीला लागली आहे.