Big News: 20 ऑक्टोबरपासून राज्यातील कॉलेज सुरु होणार; उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची घोषणा

राज्यातील शाळा सुरु झाल्यानंतर आता 20 ऑक्टोबर पासून राज्यातील पदवी महाविद्यालये सुरु होणार आहेत(Colleges in the state will start from October 20). बुधवारी राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत(Higher and Technical Education Minister Uday Samant) यांनी पत्रकार परिषद घेत या निर्णयाची घोषणा केली. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी कशा प्रकारे करायची याचे अधिकार स्थानिक प्रशासनावर सोपवण्यात आले आहेत.

    मुंबई : राज्यातील शाळा सुरु झाल्यानंतर आता 20 ऑक्टोबर पासून राज्यातील पदवी महाविद्यालये सुरु होणार आहेत(Colleges in the state will start from October 20). बुधवारी राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत(Higher and Technical Education Minister Uday Samant) यांनी पत्रकार परिषद घेत या निर्णयाची घोषणा केली. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी कशा प्रकारे करायची याचे अधिकार स्थानिक प्रशासनावर सोपवण्यात आले आहेत.

    राज्यातल्या शाळा सुरु होऊन आठवडा उलटला, शालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी शहरी व ग्रामीण दोन्ही भागांत उपस्थिती ही लावू लागले आहेत. मात्र, विविध पदवी अभ्यासक्रमाचे मात्र अजूनही घरी बसून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. राज्यातल्या पदवी व पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थांना अद्याप प्रत्यक्षात वर्ग सुरु करण्याची परवानगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून मिळाली नव्हती.

    लसीकरण होऊनही विद्यार्थी घरूनच शिक्षण घेत आहेत. त्यामुळे शासन व उच्च तंत्र शिक्षण विभागाने महाविद्यालये लवकरात लवकर सुरू करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी विद्यार्थी पालकांकडून सातत्याने करण्यात येत होती. या मागणीची दखल घेत राज्याच्या सर्व विद्यापीठांकडून स्थानिक पातळीवरील अहवाल मागवण्यात आला होता. यावर मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा करुन महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे उदय सामंत यांनी सांगीतले.

    विद्यापीठ, महाविद्यालये यांचे वर्ग 50% पेक्षा अधिक सुरू करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकरणाला असणार आहेत. कॉलेजला येणाऱ्या विद्यार्थ्यांचे दोन्ही डोस पूर्ण असावेत. कोरोनाचा प्रदूर्भाव पाहता महाविद्यालय सुरू ठेवायची का हा सर्वस्वी स्थानिक प्राधिकरणाला असतील असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

    शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक यांच लसीकरण पूर्ण झालं पाहिजे. विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले नसेल तर महाविद्यालयांनी कॅम्प घेत लसीकरण करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कॉलेजसह वस्तीगृह सुरू करण्याचा आदेशही देण्यात आलेत.