पश्चिम मार्गावरील प्रवाशांना दिलासा; मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज Mega Block; वेळापत्रक पाहूनच प्रवासाचा आखा बेत

मुलुंड (Mulund) येथून सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४६ पर्यंत सुटणारी डाऊन धीमी /अर्धजलद सेवा (down slow semi fast Services) मुलुंड आणि दिवा (Diva) स्थानकांदरम्यान डाऊन जलद (Down Fast) मार्गावर वळवली जाईल व ठाणे आणि दिवा स्थानकांवर थांबेल आणि वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचेल.

  मुंबई : मध्य रेल्वे (Central Railway) तर्फे, मुंबई विभागात (Mumbai Division) आपल्या उपनगरीय मार्गावर (Suberban Routes) आज विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे (Repair and Maintainance Work) करण्यासाठी मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. पश्चिम मार्गावर (Western Line) कोणताही जम्बोब्लॉक (Jumbo Block) घेण्यात येणार नसल्याने येथील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. प्रवाशांनी आज वेळापत्रक पाहूनच मगच प्रवासाचे बेत आखावेत (Passengers should plan their journey only after seeing the timetable today).

  ठाणे-दिवा अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.०० पर्यंत

  मुलुंड (Mulund) येथून सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४६ पर्यंत सुटणारी डाऊन धीमी /अर्धजलद सेवा (down slow semi fast Services) मुलुंड आणि दिवा (Diva) स्थानकांदरम्यान डाऊन जलद (Down Fast) मार्गावर वळवली जाईल व ठाणे आणि दिवा स्थानकांवर थांबेल आणि वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचेल.

  कल्याण (Kalyan) येथून सकाळी १०.३७ ते दुपारी ३.४१ पर्यंत सुटणाऱ्या अप धीमी/अर्धजलद सेवा दिवा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील व दिवा आणि ठाणे स्थानकांवर थांबून पुढे मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि गंतव्यस्थानावर वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT, Mumbai) येथून सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० दरम्यान सुटणाऱ्या/येणाऱ्या सर्व अप आणि डाऊन धीम्या सेवांचे वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने आगमन/प्रस्थान होईल.

  हार्बर मार्ग

  पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत

  (बेलापूर- खारकोपर सेवा प्रभावित होणार नाही; नेरुळ-खारकोपर सेवा रद्द राहतील)

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून (CSMT, Mumbai) सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ या वेळेत पनवेल/बेलापूरसाठी (Panvel/Belapur) सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील (Harbour Line) सेवा आणि पनवेल येथून सकाळी १०.४९ ते सायंकाळी ४.०१ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या दिशेने सुटणाऱ्या अप (Up) हार्बर मार्गावरील सेवा रद्द (Cancel) राहतील.

  पनवेल येथून सकाळी ९.०१ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाण्याच्या दिशेने सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० या वेळेत पनवेलच्या दिशेने सुटणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  नेरूळ येथून सकाळी १०.१५ ते दुपारी २.४५ या वेळेत खारकोपरला सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा आणि खारकोपर येथून सकाळी १०.४५ ते दुपारी ३.१५ या वेळेत नेरूळ करीता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  ब्लॉक कालावधीत बेलापूर आणि खारकोपर दरम्यान उपनगरीय ट्रेन सेवा वेळापत्रकानुसार चालतील.

  ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी विभागात विशेष लोकल चालविण्यात येतील.

  ब्लॉक कालावधीत ठाणे -वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.

  पश्चिम मार्ग

  पश्चिम रेल्वे (Western Line) मार्गावर आज कोणताही जम्बोब्लॉक (Jumbo Block) घेण्यात येणार नाही. यासंबंधीची माहिती सर्व रेल्वे स्थानकात स्टेशन मास्तर कार्यालयात उपलब्ध आहे.