‘शिक्षणाचा अधिकार कायदा’ अंतर्गत मोफत शाळा प्रवेशास सुरुवात

‘लॉटरी’ द्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दिनांक ११ जून २०२१ पासून सुरु करण्यात आली आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांची ‘लॉटरी’ द्वारे निवड झाली असेल, त्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश ३० जून २०२१ पूर्वी निश्चित करावा, असे आवाहन महापालिका शिक्षण विभागाद्वारे करण्यात आले आहे.

  ‘बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९’ मधील कलम १२(१) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर वंचित व दुर्बल घटकातील मुला / मुलींसाठी २५ टक्के जागा राखीव असतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आली आहे. त्यानुसार सन २०२१-२२ या वर्षाकरीता दिनांक ७ एप्रिल २०२१ रोजी ‘लॉटरी’ काढण्यात आली.

  ‘लॉटरी’ द्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दिनांक ११ जून २०२१ पासून सुरु करण्यात आली आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांची ‘लॉटरी’ द्वारे निवड झाली असेल, त्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश ३० जून २०२१ पूर्वी निश्चित करावा, असे आवाहन महापालिका शिक्षण विभागाद्वारे करण्यात आले आहे.

  पालकांसाठी मार्गदर्शक सूचनाः

  १. ‘आर. टी. ई.’ प्रवेश प्रक्रिया सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरीता ज्या बालकांची लॉटरीद्वारा निवड झाली आहे, त्यांनी दिनांक ११ ते ३० जून २०२१ पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा.

  २. शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करु नये. तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना आपल्याबरोबर घेऊन जाऊ नये.

  ३. ‘आर. टी. ई.’ प्रवेश घेण्यासाठी शाळेकडून प्रवेशाचा दिनांक अर्जात नमूद केलेल्या ‘भ्रमणध्वनी’ (मोबाईल) वर ‘लघुसंदेश’ (SMS) द्वारा कळविण्यात येईल. परंतु, पालकांनी ‘SMS’ वर अवलंबून न राहता student.maharashtra.gov.in या ‘RTE’ पोर्टल वरील ‘Application Wise Details’ (अर्जाची स्थिती) या ‘tab’ वर ‘click’ करुन प्रवेशाचा दिनांक पहावा व त्याच दिवशी शाळेत जावे.

  ४. पालकांनी प्रवेशाकरीता घेऊन जाण्याची कागदपत्रेः
  – प्रवेशासाठी लागणारी मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती.

  – ‘आर. टी. ई.’ पोर्टलवरील हमीपत्र आणि अर्जाची स्थिती यावर ‘click’ करुन ‘हमीपत्र’ आणि ‘ऍलोटमेंट लेटर’ (Allotment Letter) ची प्रिन्ट काढून शाळेत घेऊन जावे.

  ५. फक्त निवड यादीतील (selection list) विद्यार्थ्यांनीच ‘Allotment Letter’ ची प्रिन्ट काढावी.

  ६. निवड यादीतील बालकांच्या पालकांना ‘लॉकडाऊन’ मुळे / बाहेरगांवी असल्याने / किंवा अन्य कारणामुळे शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणे शक्य नसेल तर त्यांनी शाळेशी संपर्क करावा आणि ‘whatsapp / email’ किंवा अन्य माध्यमांद्वारे बालकाच्या प्रवेशाची आवश्यक कागदपत्रे सादर करुन आपल्या पाल्याचा शाळेतील तात्पुरता प्रवेश निश्चित करावा. शाळेच्या प्रवेशद्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत.

  ७. विहित मुदतीनंतर निवड यादीतील संबंधीत पालकांचा प्रवेशाचा हक्क राहणार नाही.

  ८. पालकांनी अर्ज भरताना अर्जात निवासाचा जो पत्ता नोंद केला आहे, त्याच पत्त्यावर ‘Google location’ मध्ये ‘red’ बलून दर्शविणे आवश्यक आहे. ‘Location’ आणि घराचा नोंदविलेला पत्ता यामध्ये तफावत आढळल्यास प्रवेश रद्द केला जाईल.

  ९. तसेच एकाच पालकांनी २ अर्ज भरुन (duplicate अर्ज) जर त्यांना लॉटरी लागली तरीही त्यांचा प्रवेश रद्द केला जाईल.

  १०. निवड यादीतील (selection list) विद्यार्थ्यांच्या प्रवेश घेण्याचा कालावधी संपल्यानंतर शाळांमधील रिक्त जागांवर प्रतिक्षा यादी (Waiting List) मधील विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्राधान्य देण्यात येईल. त्याबाबतच्या सविस्तर सूचना ‘आर. टी. ई.’ पोर्टलवर दिल्या जातील.