uddhav thakre

पहिला विषय म्हणजे पुरग्रस्तांसाठी आज मोठ्या पॅकजेची घोषणा होणार का ?, दुसरा विषय म्हणजे लसवंतांसाठी लोकल प्रवासाची मुभा मिळणार का? आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे खासगी शाळांमध्ये लवकरच १५ टक्के फी कपात होणार का ?, या तीन महत्त्वाच्या मुद्यांवर निर्णय होण्याची शक्यता आहे.

  मुंबई –  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीला पोहोचले असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरूवात झाली आहे. यामध्ये महत्त्वाच्या तीन विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

  पहिला विषय म्हणजे पुरग्रस्तांसाठी आज मोठ्या पॅकजेची घोषणा होणार का ?, दुसरा विषय म्हणजे लसवंतांसाठी लोकल प्रवासाची मुभा मिळणार का? आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे खासगी शाळांमध्ये लवकरच १५ टक्के फी कपात होणार का ?, या तीन महत्त्वाच्या मुद्यांवर निर्णय होण्याची शक्यता आहे.

  राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या कोसळधार पावसामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला महापूराचा मोठा तडाखा बसला आहे. अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहेत. पुरामुळे हाहा:कार उडून आठ दिवस झाले तरी पूरग्रस्तांना अद्याप राज्य किंवा केंद्र सरकारकडून अद्यापही मदत मिळालेली नाहीये. त्यामुळे सरकारी मदत कधी येईल याची पूरग्रस्तांना प्रतिक्षा आहे. मात्र, आज होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत पूरग्रस्तांना मदत देण्याचा शंभर टक्के निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

  कॅबिनेटच्या बैठकीत पूरग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय होणार

  आज होत असलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत पूरग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय होणार आहे. तसेच एनडीआरएफच्या निकषांपेक्षाही अधिक मदत पूरग्रस्तांना दिली जाईल. या शिवाय छोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांनाही दिलासा दिला जाईल, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

  लसवंतांसाठी लोकल प्रवासाची मुभा मिळणार का?

  लसवंतांसाठी लोकल प्रवासाची मुभा मिळणार का, याबाबत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. ज्यांनी कोरोना  प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना लोकल, बस, एसटी किंवा दुकानं सुरु करण्यासाठी परवानगी मिळावी या मताचा मी आहे. तशी मानसिकता आमच्या मंत्र्यांची आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत त्याबाबत चर्चा होईल, असं विधान अस्लम शेख यांनी केलं आहे.

  खासगी शाळांमध्ये लवकरच १५ टक्के फी कपात होणार का ?