या कारणासाठी कंगनाविरोधात विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(uddhav thakre) यांचा एकेरी उल्लेख करत बॉलिवूड माफियांशी संबंध असल्याचे वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौत(kangna ranawat) हिच्या विरोधात अखेर गुन्हा(crome) दाखल करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांची बदनामी केल्याप्रकरणी विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये(vikroli police station) कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कंगनाचा पाली हिल येथील बंगल्याचे बांधकाम तोडण्याशी कुठलाही थेट संबंध नसताना ट्विटरवर व्हिडिओ(video on twitter) अपलोड करून मुख्यमंत्र्यांवर आरोप करून त्यांची बदनामी केल्याचा तक्रारदार अॅडव्होकेट नितीन माने यांनी आरोप केला आहे.
याप्रकरणी विक्रोळी कोर्टातही अब्रूनुकसानीचा खटला कंगनाविरोधात चालवला जाणार असल्याच नितीन माने(nitin mane) यांनी म्हटले आहे. कंगना रणौत ही मुंबईत पोहोचली. मात्र, तिनं आपल्या घरी पोहोचताच एक व्हिडिओ ट्विट केला होता. यात तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे. व्हिडिओ शेअर करत मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर संताप व्यक्त केला होता.