अनिल देशमुखांविरोधात लढणाऱ्या जयश्री पाटलांविरोधात तक्रार, मराठा क्रांती मोर्चानं नोंदवले हे आक्षेप

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात केस करण्यात पुढाकार घेणाऱ्या ऍड. जयश्री पाटील यांनी केलेली विधानं मराठा मोर्चाच्या नेतृत्वाला आक्षेपार्ह वाटत आहेत. अनिल देशमुख हे पॉवरफुल मराठा नेते असतील, मात्र कायद्यापेक्षा कुणीच मोठा नाही, असं विधान ऍड. पाटील यांनी केलं होतं. जयश्री पाटील या कुठल्याही प्रकरणाविषयी बोलत असताना जाणीवपूर्वक मराठा समाजाचा उल्लेख करतात आणि मराठा समाजावर विनाकारण टीका करतात, असा आरोप या तक्रारीत करण्यात आलाय.

    महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात करणाऱ्या ऍड. जयश्री पाटील यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आलीय. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीची मागणी ऍड. पाटील यांनी लावून धरल्यानेच उच्च न्यायालयात देशमुखांविरोधात सुनावणीने वेग घेतल्याचं सांगितलं जातं.

    माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात केस करण्यात पुढाकार घेणाऱ्या ऍड. जयश्री पाटील यांनी केलेली विधानं मराठा मोर्चाच्या नेतृत्वाला आक्षेपार्ह वाटत आहेत. अनिल देशमुख हे पॉवरफुल मराठा नेते असतील, मात्र कायद्यापेक्षा कुणीच मोठा नाही, असं विधान ऍड. पाटील यांनी केलं होतं. जयश्री पाटील या कुठल्याही प्रकरणाविषयी बोलत असताना जाणीवपूर्वक मराठा समाजाचा उल्लेख करतात आणि मराठा समाजावर विनाकारण टीका करतात, असा आरोप या तक्रारीत करण्यात आलाय. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंदवण्यात आलीय.

    असे आहे प्रकऱण

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीखोरीचा आरोप करणारे पत्र मुख्यमंत्री आणि राज्यपालांना लिहिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातही त्यांनी धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग केले होते. त्याचवेळी ऍड. जयश्री पाटील यांनीदेखील मुंबई उच्च न्यायालयात याचिका करून अनिल पाटील यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली होती.

    अनिल देशमुख कितीही पॉवरफुल मराठा नेते असले तरी कायद्यापेक्षा मोठे नाहीत, असा दावा पाटील यांनी केला होता. यापूर्वी मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाला आक्षेप घेत ऍड. जयश्री पाटील यांनी वारंवार याचिका दाखल केल्या आहेत. मराठा आरक्षणाला त्यांनी वारंवार विरोध केला आहे.