गौरीशंकर मिठाईवाला विरोधात एफडीएकडे तक्रार

मुंबई : मुंबईतील गौरिशंकर मिठाईवाला यांच्या दुकानातील मिठाई  ठेवण्याची कपाटे आणि मिठाईचे साहित्य काही कामगार रस्त्यावरील पावसाच्या। साचलेल्या पाण्याने
धुत असल्याच व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हयरल झाला होता. यावरून सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ अनसुरकर यांनी अन्न आणि औषध प्रशासनाला (एफडीए)तक्रार दिली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या मिठाईवाल्यावर कारवाईची मागणी केली आहे.

मुंबईत कोविडने थैमान घातले आहे. अश्यात दक्षिण मुंबईत गौरीशंकर मिठाईवाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता चक्क रस्त्यावर साठलेल्या पाण्याने मिठाई ठेवण्याची कपाटे आणि साहित्य धुवून काढली असून अनसुरकर यांनी हा व्हिडीओ आपल्या कॅमेऱ्यात कैद करून व्हायरल केला होता.
सोशल मीडिया वर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे या प्रकाराविरोधात नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

मंगळवारी रात्रभर झालेल्या पावसाने मुंबईची तुंबई झाली. पालिकेकडून पाणी उपसण्याचे काम सुरू होते. तर दुसरीकडे रस्त्यावरच्या पाण्याने आपल्या दुकानाची स्वच्छता करण्यात दुकानातील कर्मचारी गुंतले होते. राजरोसपणे हा प्रकार सुरू होता. रस्त्यावरील पाण्याने कर्मचारी ज्या वस्तू धुवत होते त्या वस्तू मिठाई ठेवण्यात येत असल्याचे अनसुरकर यांचे म्हणणे आहे.

या प्रकारामुळे मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.याविरोधात अनसुरकर यांनी पालिकेच्या एफ दक्षिण विभाग, आरोग्य विभागाकडे तक्रार केली होती.

मात्र पालिका अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने अनसुरकर यांनी एफडीएकडे तक्रार करत दुकान चालकावर कारवाईची मागणी केली आहे.