पश्चिम मार्गावरील प्रवाशांची चिंता मिटली, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; क्लिक करा आणि जाणून घ्या सविस्तर

घाटकोपर येथून सकाळी १०.४० ते दुपारी ३.५२ पर्यंत  सुटणाऱ्या अप-धीम्या मार्गावरील रेल्वे सेवा विद्याविहार व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत तसेच या सेवा विद्याविहार, करी रोड, चिंचपोकळी, सँडहर्स्ट रोड आणि मशिद या स्थानकांवर थांबणार  नाहीत. 

  मुंबई : मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व विद्याविहार दरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी  ३.५५ पर्यंत

  सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३६ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या धीम्या सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील तसेच या सेवा मशिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड, आणि विद्याविहार या स्थानकांवर थांबणार  नाहीत व त्यानंतर नियोजित मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील.

  घाटकोपर येथून सकाळी १०.४० ते दुपारी ३.५२ पर्यंत  सुटणाऱ्या अप-धीम्या मार्गावरील रेल्वे सेवा विद्याविहार व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत तसेच या सेवा विद्याविहार, करी रोड, चिंचपोकळी, सँडहर्स्ट रोड आणि मशिद या स्थानकांवर थांबणार  नाहीत.

  ब्लॉक कालावधीत अप व डाऊन धीम्या मार्गावरील रेल्वे सेवा मशिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड, आणि विद्याविहार या स्थानकांवर  उपलब्ध होणार नाहीत.

  हार्बर मार्ग

  कुर्ला-वाशी अप व डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० दरम्यान

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ पर्यंत वाशी / बेलापूर / पनवेल करीता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा तसेच पनवेल/ बेलापूर / वाशी येथून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कुर्ला दरम्यान तसेच पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष सेवा चालविण्यात येतील.

  हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते संध्याकाळी ४.३० या वेळेत मेन लाइन आणि ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

  पश्चिम रेल्वे मार्ग

  पश्चिम रेल्वे मार्गावर कोणत्याही प्रकारचा मेगाब्लॉक नाही अशी माहिती मुख्य प्रवक्ते सुमित ठाकूर यांनी दिली.