वैद्यकीय विद्यार्थ्याना शुल्क भरण्यासाठी सवलत द्या – युवासेनेचे सीईटी सेलला पत्र

मुंबई :वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागांसाठी गुणवत्ता यादी राज्य प्रवेश नियामक प्राधिकरणांनी (सीईटी सेल) संकेतस्थळावर जाहीर केली. तसेच विद्यार्थ्याना प्रवेश निश्चित करणे आणि शुल्क

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागांसाठी गुणवत्ता यादी राज्य प्रवेश नियामक प्राधिकरणांनी (सीईटी सेल) संकेतस्थळावर जाहीर केली. तसेच विद्यार्थ्याना प्रवेश निश्चित करणे आणि शुल्क भरण्यासाठी मुदत दिली आहे. पण कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा सर्वांनाच आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे विद्यार्थ्याना कॉलेजचे शुल्क भरणे अवघड असल्याने शुल्क भरण्यामध्ये त्यांना सवलत देण्यात यावी, तसेच पुढील शुल्क टप्प्याटप्प्याने घ्यावे असे विनंतीवजा पत्र युवासेनेकडून सीईटी सेलला केली आहे. 

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव संक्रमण रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनचा फटका सर्वांनाच बसला आहे. या बिकट परिस्थितीमध्ये विद्यार्थी पूर्ण शुल्क भरू शकत नाहीत. तसेच शैक्षणिक कर्जाकरिता बँकेची प्रक्रियासुद्धा पूर्ण होत नाही आहे. अशा अडचणीत सापडलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी युवासेना प्रमुख व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे शुल्क भरण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात यावी अशी विनंती केली होती. याची दखल घेत युवासेनेने शुल्कामध्ये विद्यार्थ्याना सवलत देण्यासंदर्भात पत्र लिहिले आहे. 
 
यामध्ये वैद्यकीय पदव्युत्तर अभ्याक्रमाच्या आणि अन्य अभ्यासक्रमाच्या सर्व प्रवेशांमध्ये विद्यार्थ्यांना कॉलेजचे शुल्क भरण्यासाठी मुभा देण्यात यावी. जेणेकरून हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. असे नमूद केले आहे. तसेच प्रवेश निश्चित करताना विद्यार्थ्यांना शुल्काचे १० टक्के आणि उर्वरित शुल्क लॉकडाऊन उघडल्यानंतर टप्प्याटप्प्याने भरण्याची मुभा दिल्यास अधिक सोयीचे होईल, असेही पत्रात म्हटले आहे. अशी माहिती युवासेना कोअर कमिटी सदस्य साईनाथ दुर्गे यांनी दिली.