अन‘लॉक’डाऊनवरून संभ्रम; हे सरकार आहे की सर्कस? भाजपचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या एका घोषणेमुळे राज्यात गुरुवारी संभ्रमाचे वातावरण होते. वडेट्टीवार यांनी राज्यात 5 टप्प्यात अनलॉक केले जाणार असून ही प्रक्रिया सुरू झाल्याची घोषणा केली. मात्र काही वेळातच, जनसंपर्क कार्यालयाकडून, अद्याप याबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचे सांगितले गेले. या गोंधळावरून विरोधी पक्षाला सरकारची कोंडी करण्याची आयतीच संधी मिळाली. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर चांगलीच टीका केली. हे सरकार आहे की सर्कस आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

    मुंबई : आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या एका घोषणेमुळे राज्यात गुरुवारी संभ्रमाचे वातावरण होते. वडेट्टीवार यांनी राज्यात 5 टप्प्यात अनलॉक केले जाणार असून ही प्रक्रिया सुरू झाल्याची घोषणा केली. मात्र काही वेळातच, जनसंपर्क कार्यालयाकडून, अद्याप याबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचे सांगितले गेले. या गोंधळावरून विरोधी पक्षाला सरकारची कोंडी करण्याची आयतीच संधी मिळाली. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर चांगलीच टीका केली. हे सरकार आहे की सर्कस आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

    महाविकास आघाडी सरकार या राज्याची अवस्था अंधेर नगरी, चौपट राजा अशी करत आहे. कोणाचा कोणाशी ताळमेळ नाही. मदत आणि पुनर्वसन मंत्री पत्रकार परिषद घेऊन ‘अनलॉक’ केल्याची घोषणा करतात. हा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाल्याचे सांगतात. काही वेळानंतर मात्र सरकारचे निवेदन येते आणि अनलॉकडाऊनचा प्रस्ताव असून निर्णय झालेला नाही, असे ट्वीट भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले आहे.