लॉकडाऊनच्या गोंधळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं भाष्य, काय म्हणाले ? : वाचा सविस्तर

गेल्या दोन दिवसांपुर्वी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात पाच टप्प्यात अनलॉक करण्याचा निर्णय घेतला होता मात्र काही वेळातच राज्यातील कोणत्याही भागातील निर्बंध हटवण्यात आले नाही. तसेच नव्या नियमांचा प्रस्ताव हा विचाराधीन असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं होतं. या गोंधळावर मुख्यमंत्र्यानी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.

    मुंबई : राज्यात कोरोनाची आकडेवारी कमी होत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपुर्वी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात पाच टप्प्यात अनलॉक करण्याचा निर्णय घेतला होता मात्र काही वेळातच राज्यातील कोणत्याही भागातील निर्बंध    हटवण्यात आले नाही. तसेच नव्या नियमांचा प्रस्ताव हा विचाराधीन असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं होतं. या गोंधळावर मुख्यमंत्र्यानी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.

    दरम्यान अजूनही निर्बंध उठवल्याचं जाहीर केलेलं नाही. स्थानिक प्रशासन हा निर्णय घेणार आहे. प्रशासनाला मदत होण्यासाठी हे निकष ठरवण्यात आले आहेत. कारण प्रशासनाला परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेता यावा, म्हणून हे केलं पण निर्बंध उठवण्यात आलेले नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. लोकसत्ताच्या ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

    आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक होती त्या बैठकीमध्ये दहावी-बारावी परीक्षेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यात हे निकष सूचवण्यात आले. मात्र त्यावेळी विजय वडेट्टीवारांचा गैरसमज झाला आणि त्यांना वाटलं ठरलंय, त्यामुळे त्यांनी जाहीर केलं. पण प्रशासनाला आढावा घेण्याची सूचना करण्यात आली होती, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेल्या स्पष्टीकरणानंतर विरोधी पक्षाने ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती.