महाविकास आघाडी अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायची की नाही या संभ्रमात : प्रविण दरेकरांचा आरोप

महाविकास आघाडी अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायची की नाही याबद्दल संभ्रमात आहेत त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाचा त्यांचा उमेदवार ठरत नाही अशी टीका विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

    मुंबई : पंढरपूरच्या पराभवानंतर भाजपचा वाढता आलेख रोखण्यासाठी महाविकासआघाडी प्रयत्न करत आहे. मतदारसंघ छोटे केले तर अमिष देता येईल, धाक दपटशाही, या जोरावर निवडणूक जिंकता येईल यासाठी प्रभाग रचना बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडी अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायची की नाही याबद्दल संभ्रमात आहेत त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाचा त्यांचा उमेदवार ठरत नाही अशी टीका विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

    नवी मुंबईच्या विकासाचे दि. बा. पाटील शिल्पकार

    जे आरडी टाटा यांचे नाव विमानतळाला देण्याबाबत ते म्हणाले की, टाटा यांचे देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी मोठे योगदान आहे पण स्थानिक भूमिपुत्रांनी दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी आंदोलन केले आहे. नवी मुंबईचा विकास दि. बा. पाटील यांच्या माध्यमातून झाल्यामुळे त्यांचे नाव द्यावे असा भूमिपुत्रांचा आग्रह आहे. स्थानिकांचा आग्रह आहे त्यानुसार विमानतळाला नाव द्यावे अशी भाजपची भूमिका आहे.

    Confusion over whether to elect Mahavikas Aghadi president Pravin Darekars allegation