Congress leader Hussain Dalwai's reaction to Dhananjay Munde's resignation

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्माने बलात्काराचा गंभीर आरोप केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणातील सत्य जोपर्यंत बाहेर येत नाही, तोपर्यंत राजीनाम्याचा प्रश्न येत नाही असे म्हणत पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंडेंना क्लिनचिट दिली आहे. मात्र, मुंडेंच्या राजीनाम्यावरुन सत्तेतील सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसचा राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला आहे.

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्माने बलात्काराचा गंभीर आरोप केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणातील सत्य जोपर्यंत बाहेर येत नाही, तोपर्यंत राजीनाम्याचा प्रश्न येत नाही असे म्हणत पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंडेंना क्लिनचिट दिली आहे. मात्र, मुंडेंच्या राजीनाम्यावरुन सत्तेतील सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसचा राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला आहे.

या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेत्यांसह, महाविकास आघाडीच्या काही नेते धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभे आहेत. तर, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा महिला आघाडी राज्यभरात आंदोलन करणार आहे.

मात्र, राज्यात सत्तेतील सहकारी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला मुंडे प्रकरणात घरचा अहेर दिला आहे. धनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते, तर त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला असता, असं विधान माजी खासदार आणि काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केले आहे.

मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानं त्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आलं होते. मात्र, भाजपा नेते कृष्णा हेगडे आणि मनसेचे मनिष धुरी यांनी थेट रेणु शर्मा विरोधात तक्रार दाखल केल्याने या प्रकरणात नवा ट्विस्ट आला. यानंतर शरद पवारांनी राजीनाम्याबाबत आपली भूमिका मांडली.