h k patil

एच.के पाटील यांची प्रकृती अस्वस्थ वाटत असल्यामुळे कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. त्यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सर्व खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मुंबई : देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोना (corona)  रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कोरोना विषाणूची बाधा (infected) सर्वसामान्य नागरिकांपासून ते लोकप्रतिनिधींनाही झाली आहे. परंतु काही लोकप्रतिनिधींनी कोरोनावर मात केली तर काहींना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला. आता, काँग्रेसचे महाराष्ट्र (Congress Maharashtra ) प्रभारी एच के पाटील (H K Patil ) यांना कोरोनाची लागण झाली आहे.

एच.के पाटील यांची प्रकृती अस्वस्थ वाटत असल्यामुळे कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. त्यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सर्व खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मागील आठवड्यात केला होता महाराष्ट्र दौरा

महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील हे मागील आठवड्यात मुंबईत आले होते. तेव्हा त्यानी राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार आणि अमित देशमुख उपस्थित होते.